फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त फोटो फेस्ट -लेन्स लेगसी छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन
"छायाचित्रण हे दृश्य अभिव्यक्तीचे एक माध्यम असून ज्यामध्ये विविध शैली, तंत्रे सामावलेली आहेत. विविध प्रकारची छायाचित्र असलेल्या प्रदर्शनातून या व्यवसायात येणाऱ्या इच्छुकांना आवश्यक कौशल्ये शिकण्याची संधी प्राप्त होते". - ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर.

फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे तर्फे रौप्य महोत्सवानिमित्त फोटो फेस्ट- लेन्स लेगसी व सिल्वर शोकेसचे 10 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2025 दरम्यान पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 10 ते सायं. 8 या वेळेत आयोजन
पुणे – फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे या संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त फोटो फेस्ट छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालनात करण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात लँडस्केप, वन्यजीवन, फॅशन, फूड फोटोग्राफी, एरियल फोटोग्राफी, औद्योगिक अशा विविध प्रकारात काढलेली छायाचित्रे बघण्यास उपलब्ध आहेत. १३ ऑगस्ट पर्यंत हे प्रदर्शन असणार असून ‘लेन्स लेगसी’ अंतर्गत प्रदर्शनामध्ये रोज संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत विविध मान्यवरांचे स्लाईड शो व व्याख्यान आयोजित केलेले आहेत. छायाचित्रण क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन खूप उपयुक्त असल्याने सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय वायचळ, उपाध्यक्ष रामनाथ भट, सचिव जी. करुणाकर, खजिनदार किशोर जगदाळे, माजी अध्यक्ष सुनील कपाडिया, उद्योजक एम. बी. नांबीयार, कार्यक्रम प्रमुख मानव जैन, ज्येष्ठ छायाचित्रकार आनंद दिवाडकर, सुहास असनीकर, विकास शिंदे, माजी नगर सेवक दिलीप पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दर्पणा आठले यांनी केले. प्रदर्शन सर्वांसाठी सकाळी १० ते सायं ८ या वेळेत खुले आणि विनामूल्य आहे. या कार्यक्रमास मिलेनियम इंजिनीयर अँड कॉन्ट्रॅक्टर प्रायव्हेट लिमिटेड आणि काँस्टाआर्च प्रायोजक म्हणून लाभले.