अमानोरा-फ्लेक्स्एनफ्लो करंडक’ स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा
अभिजीत रानाडे, सुरज राठी, सोनु मातंग, गौरव देशमुख, पिनाक अनाप यांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

हडपसर येथील अमानोरा फर्न क्लब येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन फ्लेक्स् एन फ्लोचे फिटनेस स्टुडिओचे संचालक सचिन संचेती यांच्या हस्ते करण्यात आले. सलामीच्या सामन्यामध्ये अभिजीत रानाडे याने कैवल्य चव्हाण याचा ६५-२८, ३१-५६, १३-४५, ६९-३२, ५९-३५, ६६-२२ असा पराभव केला. पुना क्लबच्या सुरज राठी याने क्यु क्लबच्या अभिषेक बोरा याच्यावर ११-५४, ६५-३१, ५५-२३, २२-४९, ७२-३२, ६७-३६ असा विजय मिळवून अनपेक्षित निकाल नोंदविला.
मानांकित युवा खेळाडू सोनु मातंग याने पीवायसी हिंदू जिमखानाच्या निमिष कुलकर्णी याचा ५५-२२, २१-४९, ६८-३२, ४४-५६, ६८-३४, ५९-२१ असा पराभव करून स्पर्धेत शानदार सलामी दिली. डेक्कन जिमखाना क्लबच्या गौरव देशमुख याने हिसान सय्यद याचा ५८-३२, २४-५१, ६५-३९, ७१-३२, ६२-३२ असा पराभव करून विजयी सलामी दिली. गुणवान खेळाडू पिनाक अनाप याने रोहीत रावत याचा ११-५७, ५४-२१, ५८-२६, ६३-४१, ६८-४२ असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
अभिजीत रानाडे वि.वि. कैवल्य चव्हाण ४-२ (६५-२८, ३१-५६, १३-४५, ६९-३२, ५९-३५, ६६-२२);
सुरज राठी वि.वि. अभिषेक बोरा ४-२ (११-५४, ६५-३१, ५५-२३, २२-४९, ७२-३२, ६७-३६);
सोनु मातंग वि.वि. निमिष कुलकर्णी ४-२ (५५-२२, २१-४९, ६८-३२, ४४-५६, ६८-३४, ५९-२१);
गौरव देशमुख वि.वि. हिसान सय्यद ४-१ (५८-३२, २४-५१, ६५-३९, ७१-३२, ६२-३२);
पिनाक अनाप वि.वि. रोहीत रावत ४-१ (११-५७, ५४-२१, ५८-२६, ६३-४१, ६८-४२).