खेलपुणेब्रेकिंग न्यूज़मराठी

एसए अजिंक्यपद करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्धा

अष्टपैलु स्पोटर्स, विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांनी उद्घाटनाचा दिवस गाजवला !!

Spread the love
पुणे.  एसए स्पोटर्स मॅनेजमेंट तर्फे आयोजित ‘एसए अजिंक्यपद करंडक’ १४ वर्षाखालील आंतरक्लब टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्धेत अष्टपैलु स्पोटर्स आणि विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला.

सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत हृषीकेश देशमुख याने केलेल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर अष्टपैलु स्पोटर्स संघाने धीरज जाधव अ‍ॅकॅडमीचा ८ गडी राखून पराभव केला आणि विजयी सलामी दिली. पहिल्यांदा फलंदाजी करताना धीरज जाधव अ‍ॅकॅडमीचा डाव ९५ धावांवर मर्यादित राहीला. श्रेयस वाघमोडे याने ३० धावांचे तर, राजवीर जाधव याने २२ धावांचे योगदान दिले. मोर्य पाटील याने एक धाव देताना तीन गडी तंबुत पाठवले. हे लक्ष्य अष्टपैलु स्पोटर्सने १३.३ षटकात व २ गडी गमावून पूर्ण केले. हृषीकेश देशमुख याने नाबाद ४६ धावांची खेळी केली आणि संघाला विजय प्राप्त करून दिला.

यशराज सोळंके आणि राजवीर होले यांनी केलेल्या फलंदाजीच्या जोरावर विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमीने क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीचा ११२ धावांनी सहज पराभव केला आणि शानदार सुरूवात केली. पहिल्यांदा खेळणार्‍या विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १८८ धावा धावफलकावर लावल्या. राजवीर होले याने नाबाद ५३ धावांची तर, यशराज सोळंके याने ४९ धावांची खेळी केली. या दोघांना शौर्य जाधव (३२ धावा) आणि साक्क्षी गोरे (नाबाद २९ धावा) यांनीसुद्धा साथ दिली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. याला उत्तर देताना क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीचा डाव ७६ धावांवर आटोपला. विजय अ‍ॅकॅडमीच्या वेदांत गोनबरे याने तीन तर, कृष्णा गायकवाड आणि रियांश ताकवले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचा माजी रणजीपटू धीरज जाधव आणि एसए स्पोटर्स मॅनेजमेंटचे शराफत अली यांच्या हस्ते करण्यात आले.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
धीरज जाधव अ‍ॅकॅडमीः २० षटकात ८ गडी बाद ९५ धावा (श्रेयस वाघमोडे ३०, राजवीर जाधव २२, मोर्य पाटील ३-१, हृषीकेश देशमुख १-१२) पराभूत वि. अष्टपैलु स्पोटर्सः १३.३ षटकात २ गडी बाद ९७ धावा (हृषीकेश देशमुख नाबाद ४६ (३६, ९ चौकार), अभिराम बापट १५, आरूष जोशी ११, श्रेयस वाघमोडे १-१५); सामनावीरः हृषीकेश देशमुख;

विजय क्रिकेट अ‍ॅकॅडमीः २० षटकात ३ गडी बाद १८८ धावा (राजवीर होले नाबाद ५३ (३५, ७ चौकार, १ षटकार), यशराज सोळंके ४९, शौर्य जाधव ३२, साक्क्षी गोरे नाबाद २९, सई परदेशी १-३३) वि.वि. क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमीः १७.१ षटकात ९ गडी बाद ७६ धावा (अनुराग जगताप १६, यथार्थ परदेशी १५, वेदांत गोनबरे ३-१०, कृष्णा गायकवाड २-५, रियांश ताकवले २-८); सामनावीरः यशराज सोळंके;

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button