
देहूगांव प्रतिनिधी , देहूगांव ते देहूरोड रस्त्यावर असलले, चिंचोली येथील शनी मंदिरामध्ये श्रावण महीन्यातील शेवटचा शनिवार आणि शनी अमावस्या निमित्त शनिवारी (दि.२३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरला आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. मंदिरात भाविकांनी दर्शनार्थ दिवसभर गर्दी केली होती.
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ३ वाजता शनी महाराजांचे अभ्यंगस्नान, नित्य महापूजा व आरती करण्यात आली. सकाळी ७ वाजता लघुरुद्र महाभिषेक, सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, सकाळी १०:३० वाजता होम हवन, महायज्ञ, दुपारी २ वाजता
भजनसेवा, सायंकाळी ७ वाजता श्री शनैश्वर विशेष पूजा व छपन्नभोग प्रसाद सेवा, सायंकाळी ७:३० वाजता महाआरती झाली. यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भजनी मंडळाच्या वतीने दिवसभर भजन सुरू होते. शनी अमावस्यानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. स्वयंसेवकांनी गर्दीचे नियोजन करीत रंगीत भाविकांना दर्शनात सोडण्यात येत होते. ट्रस्टच्या वतीने भाविकांना दिवसभर प्रसादाचे वाटप करण्यात येत होते.
ट्रष्टचे पदाधिकारी, सदस्य, सामाजिक शनैश्वर देवस्थान संतोष जाधव रमेश जाधव बाळासाहेब जाधव सर्व ग्रामस्थ उपस्थित होते