जीवन शैलीधर्मब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्र
मुळशीत एक एकर शेतात साकारले 200 फूट ज्ञानोबा माऊली
आषाढी वारीचा मुळशी पॅटर्न

मुळशी .आषाढी वारी निमित्त मुळशी तालुक्यातील वातुंडे गावात नाचणीच्या पिकामधून तब्बल 200 फूट संत ज्ञानेश्वर महाराज साकार झाले आहेत.महादेव राघू शिंदे व नामदेव राघू शिंदे यांच्या शेतात हे चित्र उगवले आहे.
कु. स्वरा लक्ष्मी बाळकृष्ण शिंदे हिच्या संकल्पनेतून ४० गुंठे शेतात २०० फूट बाय १५० फूटाचे हरित चित्र साकार झाले आहे. २१ दिवसात हे चित्र उगवले आहे. ज्ञानांकुर प्रतिष्ठान, सेवाभावी संस्था, ॐ साई ग्रुप व वातुंडे, भोडे ग्रामस्थाच्या सहकार्याने हे कृषी चित्र निर्माण झाले आहे