ब्रेकिंग न्यूज़मराठी

साउथ इंडियन बँकेने पुन्हा एकदा इतिहास रचताना विक्रमी १३०३ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद, ४० टक्के लाभांशाची शिफारस

Spread the love

पुणे . साउथ इंडियन बँकेने आर्थिक वर्ष २४-२५ मध्ये अतिशय चमकदार कामगिरी करताना १३०२.८८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. आर्थिक वर्ष २३-२४ मधील १०७०.०८ कोटी रुपयांच्या तुलनेत गत आर्थिक वर्षात निव्वळ नफ्यात २१.७५ टक्के वाढ झाली आहे.

आर्थिक कामगिरी जाहीर करताना साऊथ इंडियन बँकेचे एमडी आणि सीईओ श्री. पी. आर. शेषाद्री यांनी सांगितले की, बँकेने खालील विभागांमध्ये बँकेच्या आजवराच्या इतिहासातील उच्चांकी कामगिरीची नोंद केली आहे:

• बँकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात १,९५,१०४.१२ कोटी रुपयांचा उच्चांकी व्यवसाय

• बँकेच्या इतिहासात १,३०२.८८ कोटी रुपयांचा उच्चांकी निव्वळ नफा

• बँकेच्या इतिहासात २,२७०.०८ कोटी रुपयांचा उच्चांकी कामकाज नफा

• बँकेच्या इतिहासातील १,८१३.४३ कोटी रुपयांचे उच्चांकी अन्य उत्पन्न

• बँकेच्या इतिहासातील ३,४८५.६४ कोटी रुपयांचे उच्चांकी निव्वळ व्याज उत्पन्न

• आतापर्यंतचा ८५.०३% उच्चांकी प्रोव्हिजन कव्हरेज रेशो (राइट ऑफसह)

• गत २० वर्षात मालमत्तेवर उच्चांकी १.०५ टक्के परतावा

• गत ११ वर्षात इक्विटीवरील १२.९० टक्के उच्चांकी परतावा

• घटलेले निव्वळ एनपीए एक टक्क्यांच्याही खाली आणण्यात यश

निकालाची प्रमुख वैशिष्ट्ये

• आर्थिक वर्ष २४ मधील १,८६७.६७ कोटी रुपयांचा कामकाजरुपी नफा आर्थिक वर्ष २५ मध्ये २,२७०.०८ कोटी रुपयांवर झेपावला असून त्यात २१.५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

• ढोबळ एनपीए (जीएनपीए) १३० बिदूंनी घटले असून ते वर्षभरात ४.५० टक्क्यांवरुन ३.२० टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

• निव्वळ एनपीए (एनएनपीए) ५४ बिंदूंनी घटून वर्षभरात १.४६ टक्क्यांवरुन ०.९२ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे.

• राइट ऑफसह पीसीआरमध्ये वर्षभऱात ५९३ बिंदूंनी वाढ होऊन हे गुणोत्तर ७९.१० टक्क्यांवरून ८५.०३ टक्क्यांवर झेपावले आहे.

• कर्जमाफी (राईट ऑफ) वगळता पीसीआर गुणोत्तर वर्षभऱात ३१० बिंदूंनी वाढून ६८.६६ टक्क्यांवरुन ७१.७७ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

• संचालक मंडळाने ४० टक्के लाभांशाची शिफारस केली असून ती एजीएममध्ये समभागधारकांच्या मान्यतेला अधीन राहणार आहे.

• ठेवींबाबतची कामंगिरी

• रिटेल प्रकारातील ठेवींत तब्बल ७,००७ कोटी रुपयांची भर पडून त्या वर्षभरात ९७,७४३ कोटी रुपयांवरुन १,०४,७४९.६० कोटी रुपयांवर झेपावल्या आहेत. रिटेल ठेवींत वार्षिक ७.१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

• अनिवासी भारतीयांच्या ठेवीत १९०६ कोटी रुपयांची भर पडून त्या वर्षभरात २९,६९७ कोटी रुपयांवरुन ३१,६०३ कोटी रुपयांवर झेपावल्या आहेत.या ठेवींत वर्षभरात ६.४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

 

• बचत खात्यातील रक्कम वर्षभरात ४.०६ टक्क्यांनी वाढून ती २६,६१८ कोटी रुपयांवरुन २७,६९९.३१ कोटी रुपयांवर झेपावली आह

 

 

कर्जवितरण

• ढोबळ कर्जवितरणात ७,१५३ कोटी रुपयांनी वाढ होऊन ते ८०,४२६ कोटी रुपयांवरुन ८७,५७८.५२ कोटी रुपयांवर झेपावले आहे. वर्षभरात या कर्जवितरणात ८.८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

• उत्तम दर्जाच्या कर्जदार खात्यांमध्ये कॉर्पोरेट विभागातील कर्जवितरण ४,११४ कोटी रुपयांनी वाढून ते ३२,०८४ कोटी रुपयांवरुन ३६,१९८ कोटी रुपयांवर पोहचले आहे. वर्षभरात त्यात १२.८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

• बड्या कॉर्पोरेट विभागातील अ आणि त्यापेक्षा उत्तम दर्जा असलेल्या कर्ज खात्यांचा कर्जवितरणातील हिस्सा ९९.७० टक्के आहे.

• सुवर्ण कर्ज पोर्टफोलिओ १,४६९ कोटी रुपयांनी वाढून १५,५१३ कोटी रुपयांवरुन १६,९८२ कोटी रुपयांवर झेपावला आहे. त्यात वार्षिक आधारावर ९.४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

• गृहकर्ज वितरण २,७९४ कोटी रुपयांनी वाढून ५,०८३ कोटी रुपयांवरुन ७,८७७ कोटी रुपयांवर झेपावले आहे आणि त्यात ५४.९७ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

• वाहन कर्ज वितरण वर्षभरात २४.३२ टक्क्यांनी वाढून ते १,५९९ कोटी रुपयांवरुन १,९८७ कोटी रुपयांवर झेपावले आहे.

 

  वर्षअखेर वर्षअखेर    

 31-03-2025 31-03-2024 वृध्दी %

ढोबळ कर्ज 87,578.52 80,426 7,153 8.89%

सुवर्ण कर्ज यासारख्या प्रकारांमध्ये दर्जेदार मालमत्ता उभी करण्यावर लक्ष केंद्रित केलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button