श्री संत तुकाराम महाराज यांचे बद्दल आक्षेपार्ह विधान केल्या बद्दल वसंत गडकर यांचा निषेध
श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका ट्रस्ट तर्फे जाहीर निषेध
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत तुकाराम महाराज यांच्या संदेह वैकूंठ गमनावर आक्षेपार्ह विधान करणारे बाळकृष्ण जनार्धन गायकवाड तथा वसंत गडकर यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट तर्फे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी वारकरी व भाविक यांचे वतीने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
वसंत गडकर यांनी महाराष्ट्रातील देहू येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत तुकाराम महाराज यांचे विषयी हजारो भाविकां समोर उघड कीर्तन करीत असताना श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन सोहळ्यावर आधारित आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई शासनाने करावी अशी मागणी ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी केली आहे. या पुढील काळात वसंत गडकर यांचे कार्यक्रमावर वारकरी व भाविकांनी बहिष्कार घालावा असे आवाहन ॲड. तापकीर यांनी केले आहे.