अलंकापुरीत अपरा एकादशी दिनी श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट
इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती उत्साहात बेशीस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील अपरा एकादशी निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास रांगा लावून दर्शनासाठी मंदिरात गर्दी केली होती. मंदिरातील श्रींचे गाभाऱ्यात एकादशी निमित्त लक्षवेधी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. भाविकां साठी उपवास असल्याने फराळाचा नैवेद्य आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. इंद्रायणी आरती समितीचे वतीने इंद्रायणी आरती हरिनाम गजरात करण्यात आली होती.
इंद्रायणी नदी घाटा लगतचे आवेकर भावे रामचंद्र संस्थान चे राम मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत श्रींची पूजा, आरती, हरिनाम गजरात कीर्तन, श्री रामरक्षास्तोत्रंम पुस्तिकेचे भाविकांना मोफत वाटप करण्यात आले. एकादशी दिनी नदी घाटावर भाविकांनी तीर्थ स्नान करीत श्रद्धा जोपासली. इंद्रायणी नदीवर पूजन, दीप दान केले. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, इंद्रायणी नदी घाट येथे भाविकांचे गर्दीने फुलला होता. मंदिरात कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळेल याची व्यवस्था मुख्य व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने, सेवक कर्मचारी यांनी केली. मंदिरा जवळचे दुकानात वारकरी संप्रदायातील साहित्य खरेदी तसेच पूजा साहित्य, प्रसाद आदी खरेदीस भाविकांनी गर्दी केली होती. नगर प्रदक्षिणा मार्गावर दिंड्या दिंड्यांतून भाविकांनी अनवाणी पायाने हरिनाम गजरात प्रदक्षिणा केली. एकादशी दिनी प्रथा परंपरांचे धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाले.
इंद्रायणी घाटावर इंद्रायणी आरती, पसायदान हरिनाम जयघोष
तीर्थक्षेत्र आळंदी जनहित फाउंडेशन, इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. अपरा एकादशी निमित्त एकादशी दिनी इंद्रायणीची आरती जनजागृती करीत सामाजिक बांधिलकी जोपासत झाली. यावेळी संयोजिका राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान अध्यक्षा अनिताताई झुजम,आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, रोहिदास कदम, उदय काळे, शशिकांराजे जाधव, गोविंद ठाकूर, सोमनाथ बेंडाले, अमर गायकवाड, शोभा कुलकर्णी, नीलम कुरधोंडकर, अनिता शिंदे, सुनीता आखणगिरे, वर्षा जाधव, पायल जाधव, प्रज्वल जाधव, सरस्वती भागवत, माजी नगरसेविका उषा नरके, बाई बरवे, लता वर्तले, सुरेखा काळभोर, राधा पगारे, संगीता महामुनी, शिला कुलकर्णी, सुनंदा चव्हाण, तारा सरोदे, रसिका गायकवाड यांचेसह वारकरी, भाविक उपस्थित होते.
इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे सेवा कार्यात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ आराखड्यात दुरुस्ती करावी. अशी मागणी इंद्रायणी आरती समितीचे प्रमुख संयोजक अर्जुन मेदनकर यांनी केली. आळंदीतील वैभवी श्री राम मंदिराचे आवेकर भावे रामचंद्र संस्थान ट्रस्ट ( श्री रॅम मंदिर ) या न्यासाचे ट्रस्टचे विश्वस्त पदी अर्जुन मेदनकर यांची नियुक्ती झाल्या बद्दल इंद्रायणी आरती समितीचे वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी महिला वारकरी भाविक उपस्थित होते.
आळंदीत बेशीस्त वाहन चालकांमुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी
आळंदीत एकादशी, लग्नाचे वऱ्हाडयांचे तसेच भाविकांच्या वाहनांसह उद्योग नगरीतील वाहनांची प्रचंड वर्दळ एकादशी दिनी राहिल्याने आळंदी शहरात प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. यात बेशिस्त वाहन चालकांमुळे अधिकची भर पडली. आळंदी – दिघी वाहतूक पोलिसांनी विशेष लक्ष देत दक्षता घेत वाहतूक कोंडी सुरळीत केली. बेशिस्त वाहन चालक आणि वाहन पार्किंग धोरणाकडे आळंदी नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याने वाहतूक कोंडीने नागरिकांची गैरसोय झाली. वाहतूक पोलिसांनी दुपारचे जेवणाकडे हि दुर्लक्ष करीत सुरळीत वाहतुकीस प्राधान्य देऊन काम परिश्रम पूर्वक पाहिले. यासाठी आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर आणि त्यांचे सहकारी सर्व पोलीस कर्मचारी, वॉर्डन यांनी परिश्रम घेतले. आळंदीतील चौका चौकातील खराब रस्ते, निखळले पेव्हींग ब्लॉक यामुळे झालेले खड्डे यामुळे चौका चौकात वाहने खड्ड्यात आदळून वाहन चालविताना झालेली कसरत पाहिल्याने वाहतूक विभागातील सेवाभावी वॉर्डन नाळे यांनी स्वताचे हाताने खड्यात लहाल लहान दगड भराव टाकून खड्डे बुजविले. यामुळे देखील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. वाहन चालकांनी नाळे यांचे कार्याचे कौतुक केले. आळंदी मंदिरासह शहरात कायदा सुव्यवस्था, शांतता कायम राखण्यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र नाईक, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे यांचेसह पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी काम पाहिले.