ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

दुभंगलेले ओठ व टाळूच्या रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

 दि ५ ते ७ डिसेंबर २०२५ रोजी डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे आणि मिशन स्माईल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

Spread the love

पिंपरी पुणे : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे आणि सरकारी नोंदणीकृत वैद्यकीय चॅरिटेबल ट्रस्ट मिशन स्माईल यांच्या सहकार्याने ५ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान विनामूल्य ‘क्लेफ्ट लिप’ व ‘क्लेफ्ट पॅलेट’ (ओठ व टाळू यांच्या जन्मजात विसंगती) शस्त्रक्रिया व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश या विकृतींनी ग्रस्त असलेल्या बालकांना आणि प्रौढांना जीवन बदलून टाकणाऱ्या पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया तसेच सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा प्रदान करणे हा आहे.

ह्या शिबिरांमध्ये रुग्णांची तपासणी, शस्त्रक्रिया, मार्गदर्शन, औषधोपचार आणि रुग्णालयातील निवासासह दोन वेळचे जेवण विनामूल्य दिले जाणार आहेत. नव्या रुग्णांसह पूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचीही तज्ज्ञ चिकित्सा पथकाकडून तपासणी व मार्गदर्शन केले जाईल. रुग्णांची तपासणी दि ५ डिसेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी येथील बाह्यरुग्ण विभाग क्र ५ A, प्लास्टिक सर्जरी विभागात सुरू होईल. जास्तीत जास्त रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे येथील प्र-कुलपती माननीय डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांनी सांगितले, “मिशन स्माईलसोबतच्या या सहयोगातून आम्ही प्रत्येक क्लेफ्ट लिप व क्लेफ्ट पॅलेट असलेल्या बालकाला जागतिक दर्जाची, संवेदनशील व करुणामय वैद्यकीय सेवा देण्याचा आमचा संकल्प दृढ करीत आहोत. आमची संस्था अशा सर्व रुग्णांना जीवनपरिवर्तन करणारे उपचार देण्याचा प्रयत्न करते, विशेषतः ज्यांना आरोग्यसेवेचा मर्यादित प्रवेश आहे.”

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांचे विश्वस्त व खजिनदार माननीय डॉ. यशराज पी. पाटील यांनी पुढे सांगितले, “मिशन स्माईलसोबतच्या या सहकार्याद्वारे आम्ही बालकांमधील जन्मजात विकृतींवर, विशेषतः क्लेफ्ट लिप आणि क्लेफ्ट पॅलेटवर लक्ष केंद्रीत करीत आहोत. आमचे शस्त्रक्रिया व सहाय्यक पथक एकत्रितपणे रुग्णांना उच्च दर्जाची, करुणामय आणि परिणामकेंद्रित सेवा देत आहेत. अशा परिवर्तनकारी शस्त्रक्रियांमुळे केवळ हास्य परत मिळत नाही तर उज्वल भविष्याची वाटही मोकळी होते. सर्वांसाठी सुलभ आणि प्रगत आरोग्यसेवा देण्याच्या आमच्या ध्येयाला हे पाठींबा देते.”

तसेच डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांच्या अधिष्ठाता डॉ. रेखा आर्कोट यांनी सांगितले, “मिशन स्माईलच्या सहभागामुळे गरजूंना प्रगत पुनर्रचनात्मक उपचार देण्याची आमची क्षमता अधिक वृद्धिंगत झाली आहे. अनेक बालकांसाठी क्लेफ्ट शस्त्रक्रिया म्हणजे स्पष्ट बोलणे, आरामात खाणे, आत्मविश्वासाने वाढणे आणि समाजात सहजपणे सहभागी होण्याची नवी संधी आहे. या उपक्रमात योगदान देणाऱ्या बहुविद्याशाखीय पथकातील प्रत्येक सदस्याच्या कौशल्याला आणि समर्पणाला मी मनापासून सलाम करते.”

या उपक्रमाबद्दल बोलताना डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे च्या प्लास्टिक सर्जरी विभागप्रमुख डॉ. गुरुस्वामी विश्वनाथ, म्हणाले, “क्लेफ्ट लिप व क्लेफ्ट पॅलेट या जन्मजात विकृती रुग्णांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक जीवनावर खोलवर परिणाम करतात. या शिबिराद्वारे आम्ही प्रत्येक रुग्णाला त्यांच्या आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता सर्वोच्च दर्जाच्या उपचारांची हमी देत आहोत.”

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे च्या सहायक प्राध्यापक, प्लास्टिक, रीकन्स्ट्रक्टिव्ह व एस्थेटिक सर्जरी विभागाच्या डॉ. पूजा दांडेकरी , यांनी सांगितले, “क्लेफ्ट विकृती असलेल्या बालकांसाठी लवकर हस्तक्षेप आणि उच्च दर्जाची शस्त्रक्रिया ही त्यांच्या भविष्याला सकारात्मक वळण देऊ शकते. या उपक्रमातून रुग्णांचा आत्मविश्वास वाढवणे, कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि जीवनमान उंचावणे या आमच्या बांधिलकीचे प्रत्यंतर मिळते.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!