नगरसेवक प्रविणशेठ भालेकर यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
बद्रीनारायण घुगे
दि.२० डिसेंबर रोजी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक प्रविणशेठ भालेकर यांनी भा.ज.प. प्रदेक्षाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण व मा. आमदार महेश दादा लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
भाजपचा मास्टर स्ट्रोक.. पिंपरी चिंचवड मधील अनेक दिग्गजांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश- पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पक्षांना मास्टर स्ट्रोक दिला आहे. आज मुंबईत अजित पवार गटाच्या आठ माजी नगरसेवकांसह अनेक दिग्गजांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केला आहे. यात माजी महापौर, माजी महापौरांच्या मुलासह, माजी स्थायी समिती अध्यक्ष, माजी उपमहापौरांचा ही समावेश आहे. असुन पिंपरी चिंचवड शहरातील इच्छुक उमेदवारांनी तिस वर पक्ष प्रवेश केला आहे
भाजपच्या या मास्टर स्ट्रोक मुळे निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी पूर्णपणे बॅकफूटवर गेली असल्याचे चित्र सध्यातरी पाहायला मिळत आहे.
यावेळी,
मा.प्रदेशाध्यक्ष, रविंद्रजी चव्हाण,
मा.शहराध्यक्ष, शत्रुघ्न काटे,
मा. आमदार महेशदादा लांडगे,
मा. आमदार शंकरजी जगताप
तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
लाखों संख्येने नागरिक उपस्थित होते



