उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल – पुण्यात उर्ग्येन संघरक्षित यांच्या शताब्दी वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सव*
कला, संगीत व ध्यानाच्या माध्यमातून ‘निर्वाण : ज्ञानप्राप्ती’ या विषयाची मांडणी

पुणे, : त्रिरत्न इन्स्टिट्यूट आणि करुणदीप फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उर्ग्येन आर्ट फेस्टिव्हल हा भव्य सांस्कृतिक सोहळा २१ ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत बालगंधर्व कला दालन, जंगली महाराज रोड, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव त्रिरत्न बौद्ध समुदायाचे संस्थापक व आधुनिक बौद्ध पुनरुज्जीवनाचे अग्रणी उर्ग्येन संघरक्षित (१९२५–२०१८) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ अस्मिता गायकवाड, मेडिकल डायरेक्टर फोर्ट्रिया USA यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला चंद्रशेखर दैठणकर (माजी.आय जी आय पी एस) डॉ. पद्माकर पंडित (मा.अधिष्ठाता वाय सी एम) डॉ. वि. दा. गायकवाड (मा.अधिष्ठाता कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुणे) संतोष संखद (दादासाहेब फाळके पुरस्कार विजेता कला दिग्दर्शक) ध.तेजदर्शन निर्माता, सुप्रसिद्ध निवेदक दीपक म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते.
‘निर्वाण : ज्ञानप्राप्ती’ या विषयावर आधारित हा महोत्सव कला आणि धम्म यांचा संगम घडवणार आहे. प्रदर्शन, थेट कला सादरीकरणे, व्याख्याने, ध्यान कार्यशाळा आणि संगीत-नृत्य सादरीकरणांच्या माध्यमातून संघरक्षित यांच्या या विचाराला उजाळा दिला जाईल की कला ही आध्यात्मिक जाणिवेचे द्वार ठरू शकते. या महोत्सवात सहभागी होण्याकरिता देश व विदेशातून सुमारे 200 हून कलावंत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
एक दूरदर्शी वारसा
उर्ग्येन संघरक्षित यांनी पूर्व आणि पश्चिम परंपरांचा सेतू बांधत आधुनिक बौद्ध धर्माला नवे आयाम दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध चळवळीत त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्यांच्या लेखन, प्रवचन आणि सांस्कृतिक-आध्यात्मिक पुनरुज्जीवनाच्या कार्यामुळे भारतासह जगभरातील लाखो लोक प्रेरित झाले.
महोत्सवाचे प्रमुख कार्यक्रम
पहिला दिवस – गुरुवार, २१ ऑगस्ट
सकाळी ११:०० – उद्घाटन समारंभ
प्रमुख पाहुणे : पद्मश्री नगवांग समतेन (नि.कुलगुरू, सेंट्रल युनिव्हर्सिटी फॉर टिबेटन स्टडीज), लोकशाहीर श्री संभाजी भगत (लेखक, दिग्दर्शक, गायक), किरण माने (अभिनेता, लेखक)
संचालन: डॉ. अस्मिता गायकवाड
सायं. ४:०० – विद्वत्परिषद – प्रा. श्रीकांत गणवीर, अतुल भोसेकर, प्रसाद पवार
सायं. ६:३० – शिल्पकला थेट सादरीकरण – किशोर पवार
सायं. ७:३० – गाण-संध्या – (शहनाई म्युझिक ग्रुप, अमरावती)
दुसरा दिवस – शुक्रवार, २२ ऑगस्ट
सकाळी ११:०० – ध्यान कार्यशाळा : ध्यान व कलेद्वारे उच्च चेतना विकास
सायं. ४:०० – चर्चासत्र – डॉ. मनोहर देसाई, निलेश नावलाखा, धम्मचारी मैत्रेयबोधी, संभाजी भगत
सायं. ६:३० – लाइव्ह कॅलिग्राफी – डॉ. मनोहर देसाई
सायं. ७:३० – डॉक्टर्स म्युझिकल ईव्हनिंग (गोष्टी तुमच्या-आमच्या)
तिसरा दिवस – शनिवार, २३ ऑगस्ट
सकाळी ११:०० – ध्यान कार्यशाळा : आपण का ध्यान करतो
सायं. ४:३० – चर्चासत्र – तेनझिन सुंद्यू, प्रा. कावेरी गिल, डॉ. महेश देवकर
सायं. ६:३० – चित्रकला सादरीकरण
सायं. ७:०० – सरोद वादन – गिरीश चारवड
चौथा दिवस – रविवार, २४ ऑगस्ट
सकाळी ११:०० – ध्यान कार्यशाळा : ध्यानासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे
सायं. ४:०० – पुस्तक प्रकाशन : उर्जेन संघरक्षित यांच्या कविता (अनुवाद : स्व. धम्मचारी धर्मरक्षित)
सायं. ६:३० – शिल्पकला सादरीकरण – प्रशांत गायकवाड
सायं. ७:३० – मराठी गझल संध्या – पं. भीमराव पांचाळे
पाचवा दिवस – सोमवार, २५ ऑगस्ट
सकाळी ११:०० – ध्यान कार्यशाळा : समता व विपश्यना समजून घेणे
सायं. ४:०० – बौद्ध व कला विषयक व्याख्याने – अशोक नागरे, धम्मचारी प्रबोधरत्न, संजय सोनवणी, झेन मास्टर सुद्दासन
सायं. ६:३० – चित्रकला सादरीकरण
सायं. ७:३० – फ्यूजन म्युझिक कॉन्सर्ट – पावा वर्ल्ड ऑफ म्युझिक
सहावा दिवस – मंगळवार, २६ ऑगस्ट
सकाळी ११:०० – उर्जेन संघरक्षित जयंती सोहळा – डॉ. धम्मचारिणी अमितमती, डॉ. गोखले
दुपारी ३:०० – शिल्पकला सादरीकरण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर व उर्जेन संघरक्षित (प्रशांत गायकवाड व किशोर पावा)
सायं. ४:०० – कलाकार सन्मान समारंभ – डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते, सन्माननीय कलाकार : संतोष संखद, डॉ. पद्माकर पंडित
सायं. ६:३० – तबला सोलो – पं. मुकेश जाधव
सायं. ७:०० – व्हायोलिन–तबला जुगलबंदी – पं. अतुलकुमार उपाध्ये व पं. मुकेश जाधव