ब्रेकिंग न्यूज़मनोरंजनमराठी

पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ला उत्कृष्ट चित्रपटाचा द्वितीय पुरस्कार  

महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२५ च्या पुरस्कार सोहळ्यात विविध पुरस्काराचे वितरण

Spread the love

पुणे ; प्रतिनिधी – ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२५ च्या पुरस्कार सोहळ्यात ‘पुनीत बालन स्टुडिओज’ची निर्मिती असलेल्या ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाला द्वितीय क्रमाकांचा उत्कृष्ट चित्रपट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक यासह अन्य सहाय्यकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ‘पुनीत बालन स्टुडिओ’च्या माध्यमातून मुळशी पॅटर्न, रानटी, जग्गू आणि ज्युलिएट अशा काही दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. तीन वर्षांपूर्वी त्यांचा ‘जग्गू आणि ज्युलियट’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. उत्तराखंडच्या निर्सगरम्य परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. त्यामधील अमेय वाघ (जग्गू) आणि वैदही परशुरामी (ज्युलिएट) यांची फुललेली प्रेमकथा, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ६१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२४ व २०२५ च्या उत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात २०२५ च्या उत्कृष्ट पुरस्कारामध्ये ‘पुनीत बालन स्टूडिओज’च्या ‘जग्गू आणि ज्युलिएट’ चित्रपटाला द्वितीय क्रमांक मिळाला. या चित्रपटातील प्रमुख कलाकार अमेय वाघ याला उत्कृष्ट अभिनेता तर याच चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये यांना उत्कृष्ट दिग्दर्शक द्वितीय क्रमांक मिळाला. तसेच याच चित्रपटातील इतरही सहकलाकारांना पुढील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट विनोदी अभिनेता- उपेंद्र लिमये, उत्कृष्ट वेशभुषा- मानसी अत्तरदे, उत्कृष्ट लेखक- अंबर हडप व गणेश पंडित आणि उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक- राहुल-संजीर याप्रमाणे ‘जग्गू आणि ज्युलिएट’ चित्रपटात कलाकारांला सन्मानित करण्यात आले.

———————————————- .

कोट

‘‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सव २०२५ च्या पुरस्कार सोहळ्यात ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाला द्वितीय क्रमाकांचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल मी सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो. याशिवाय या चित्रपटाचे दिग्दर्शक, अभिनेता व इतर सहायकांना विविध पुरस्कार मिळाले त्यांचेही मनःपूर्वक अभिनंदन. ‘पुनीत बालन स्टुडिओज’ निर्मित सर्वच चित्रपटांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, याबाबत मी प्रेक्षकांचाही आभारी असून भविष्यात अशाच दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून प्रेक्षकांचे प्रेम मिळविण्याचा प्रयत्न करेल.’’

          – पुनीत बालन, निर्माते, पुनीत बालन स्टुडिओज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!