क्रेडाई-पुणे मेट्रोकडून २५,००० झाडांची लागवड – पर्यावरण दिनानिमित्त हरित पुण्यासाठी भक्कम पाऊल

पुणे: *जागतिक पर्यावरण दिनानिमित्त क्रेडाई-पुणे मेट्रोने पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी)* सहकार्याने आज हडपसर येथे महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण मोहीम सुरू केली. हा उपक्रम क्रेडाई-पुणे मेट्रोच्या शहर सौंदर्यीकरण मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. संपूर्ण पुणे शहरात २५,००० झाडे लावून हिरवेगार आणि शाश्वत पुणे घडवण्याचा क्रेडाईचा निर्धार आहे. या उद्दिष्टाच्या दिशेने आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पहिले पाऊल टाकण्यात आले आहे.
*अर्बन फॉरेस्ट मेथॉड या मोहिमेची सुरुवात* करत, अर्थात *शहरी दाट वननिर्मितीच्या प्रभावी तंत्राचा वापर करून सुमारे १,००० झाडांची लागवड करण्यात आली* , जी शहरांमध्ये हिरवळ वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरेल. अहुरा बिल्डर्सने या वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्व केले. त्याला एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेने ५० झाडे लावण्यास सुरुवात करून पाठिंबा दिला. क्रेडाई पुणेच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात वृक्षारोपण मोहीम सुरू राहणार आहे.
या कार्यक्रमाला, *नवनियुक्त आयुक्त श्री. नवल किशोर राम, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता श्री. प्रशांत वाघमारे आणि क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्री. मनीष जैन* यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण उपक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमात क्रेडाई पुणेचे सदस्य, समुदाय स्वयंसेवक आणि पर्यावरणीय स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग होता. या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त श्री. बाळासाहेब ढवळे पाटील, श्री. उमेश शिद्रुक व श्री. हनुमान खलाटे (पुणे महानगरपालिका उपअभियंते) तसेच नगरसेवक श्री. योगेश सूर्यांशी, सौ. नंदा लोणकर, सौ. प्राची आल्हाट, श्री. मनोज आबा घोले पाटील आणि श्री. प्रमोद भानगिरे उपस्थित होते.
या कार्यक्रमाबद्दल बोलताना *नवल किशोर राम म्हणाले,* “क्रेडाई-पुणे मेट्रोने हाती घेतलेला हा महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण उपक्रमाचे अत्यंत कौतुकास्पद आहे. नागरी संस्था आणि जबाबदार उद्योग भागीदारांमधील असे सहयोगी प्रयत्न अधिक हिरवेगार, अधिक शाश्वत पुणे निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे आहेत. झाडे ही केवळ पर्यावरणीय जबाबदारीचे प्रतीक नाहीत तर ती हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी, जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी आणि मानवी जीवनाची एकूण गुणवत्ता वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. आपल्या शहराच्या पर्यावरणीय कल्याणात अर्थपूर्ण योगदान देणारी भागीदारी यापुढेही सुरू राहील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
या कार्यक्रमाबद्दल बोलताना, *प्रशांत वाघमारे* म्हणाले, “हा वृक्षारोपण उपक्रम हरित पुणे विकसित करण्याच्या आमच्या ध्येयात आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. क्रेडाई-पुणे मेट्रोच्या सामूहिक जबाबदारीची शक्ती यातून दिसून येते. आज आपण लावलेले प्रत्येक झाड हे निरोगी आणि शाश्वत उद्याच्या दिशेने एक पाऊल आहे. स्वच्छ, हिरवेगार शहरी पर्यावरणाच्या आमच्या दृष्टिकोनाशी जुळणाऱ्या अशा प्रयत्नांना पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्याचा आम्हाला अभिमान आहे.”
*क्रेडाई-पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनीष जैन म्हणाले* , “क्रेडाई-पुणे मेट्रोमध्ये आम्ही नेहमीच विकास आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा समतोल राखण्यावर भर देतो. चेन्नईस्थित Communitree या स्वयंसेवी संस्थेसोबत केलेली ही झाडलागड मोहीम आपल्या परिसरातील हरित पट्टा पुनर्संचयित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. क्रेडाई नॅशनलच्या ग्रीन कौन्सिलचे ॲम्बेसिडर श्री. सतीश मागर यांची पर्यावरणपूरक उपक्रमांप्रती असलेली निष्ठा व नेतृत्व आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरते. विकास आणि निसर्ग यांचा समतोल साधत एक शाश्वत भविष्यासाठी आम्ही एकत्रितपणे प्रयत्नशील आहोत. ”
*क्रेडाई पुणे मेट्रोच्या वृक्षारोपण उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे*
• पुण्यात २५,००० झाडे लावणार
• जलद आणि दाट हिरवळीसाठी शहरी वन लागवड पद्धतीचा वापर
• सध्या सुरू असलेल्या शहर सौंदर्यीकरण मोहिमेचा भाग म्हणून २०,००० झाडे लावणार
• पुढील तीन आठवडे वृक्षारोपण मोहीम सुरू राहील
हा उपक्रम पर्यावरण आणि शहराप्रती क्रेडाई-पुणे मेट्रोच्या जबाबदारीचे प्रतिबिंब आहे. संपूर्ण समाजात अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्यासाठी क्रेडाई-पुणे मेट्रोने पीएमसी आणि स्थानिक समुदायांसोबत भागीदारी केली आहे. हा कार्यक्रम सार्वजनिक संस्था, खासगी क्षेत्रातील भागधारक आणि स्थानिक नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे, ज्यामुळे पुणे शहराला हरित शहरी विकासाचे मॉडेल बनवणे शक्य होणार आहे. शहरी वनीकरणामुळे हवेची गुणवत्ता सुधारेल, जैवविविधता वाढेल आणि निरोगी शहरी वातावरण निर्माण होईल.