भारताच्या बचावात्मक क्षेत्रात गुंतवणूक करा – डीएसपी म्युच्युअल फंडातर्फे आयटी आणि आरोग्यसेवा क्षेत्रांवर आधारित इंडेक्स फंड योजना सादर
पुणे – डीएसपी म्युच्यूअल फंडाने डीएसपी निफ्टी आयटी इंडेक्स आणि डिएसपी निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स फंड हे दोन नवीन फंड गुंतवणूकदारांसाठी आणले आहेत. व्यापक स्वरुपातील शेअरबाजाराच्या तुलनेत लवचिकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदारांना मार्ग प्रदान करणे, हे या फंडांचे उद्दिष्ट आहे.
माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि आरोग्यसेवा (हेल्थकेअर) यासारख्या बचावात्मक क्षेत्रांनी ऐतिहासिकदृष्ट्या व्यापक शेअर बाजाराच्या तुलनेत अल्प बीटा दर्शविला आहे. याचाच अर्थ बाजारात मंदी असताना अथवा आर्थिक संकटे किंवा भू-राजकीय घटनांचा या दोन क्षेत्रांवर अत्यल्प परिणाम झालेला आहे. उदाहरणार्थ, जागतिक वित्तीय संकट (जानेवारी – ऑक्टोबर २००८) आणि कोविड-१९ साथीच्या काळात (जानेवारी – मार्च २०२०), निफ्टी हेल्थकेअर आणि निफ्टी आयटी निर्देशांकांत माफक घसरण झाली आणि त्यांनी वेगाने उसळी मारत व्यापक निफ्टी ५०० निर्देशांकाच्या तुलनेत जोरदार कामगिरी बजावलेली आहे. 1
माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांना वैविध्यपूर्ण जागतिक महसूलाचा फायदा होतो. त्यामुळे देशांतर्गत आर्थिक चक्रांवर त्यांचे अवलंबित्व कमी होते. आकडेवारीच्या दृष्टीकोनातून उदाहरण द्यायचे झाल्यास, निफ्टी आयटी निर्देशांकातील कंपन्यांच्या एकूण महसुलापैकी ~ 96 टक्के महसुलाचा भाग हा भारताव्यतिरिक्त विविध जागतिक बाजारपेठांमधून येतो. 2 त्याचप्रमाणे, निफ्टी हेल्थकेअर निर्देशांकातील कंपन्यांच्या एकूण महसुलापैकी ~ 52 टक्के महसुल त्यांना जागतिक बाजारपेठांमधून मिळतो. या आकडेवारीच्या उलट, निफ्टी फिफ्टी निर्देशांकातील कंपन्यांना जागतिक बाजारपेठांमधून केवळ ~ 25 टक्के महसुल प्राप्त होतो.3
निफ्टी आयटी निर्देशांकाच्या अनुरूप वाटचाल करणे अथवा त्याची कामगिरी आपल्या कामगिरीत प्रतिबिंबित करणे, हे डीएसपी निफ्टी आयटी इंडेक्स फंडाचे उद्दिष्ट आहे. हा फंड बाजारातील तरल भांडवलाच्या निकषानुसार आघाडीच्या १० आयटी कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या कंपन्यांत गुंतवणूक करणार आहे. भारतीय आयटी क्षेत्राने तुलनेने उत्पन्नात कमी चढउतार दाखविताना त्यात सहजरित्या वाढ दर्शविली आहे. त्यामुळे उत्पन्नाबाबत आश्चर्याचे फारसे धक्के जाणवलेले नाहीत. गेल्या १२ वर्षांत निफ्टी आयटी निर्देशांकाने सातत्यपूर्ण उत्पन्न वाढ प्रदान करताना अन्य अनेक क्षेत्रांना पिछाडीवर टाकले आहे. व्यापक बाजारपेठेच्या तुलनेत अलिकडच्या वर्षांत आयटी क्षेत्राने फारशी चमकदार कामगिरी केलेली नसली तरी4, या क्षेत्राच्या बाबतीत आता ऐतिहासिक चक्रे बदलण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी क्षेत्र-केंद्रित गुंतवणूकीबाबत विचार करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. .
डीएसपी निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स फंड निफ्टी हेल्थकेअर निर्देशांकाआधारे वाटचाल करत निर्देशांकाच्या कामगिरीनुरुप कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. शेअरबाजारातील तरल भांडवलमूल्यानुसार आघाडीच्या वीस आरोग्यसेवा कंपन्यांत समावेश असलेल्या कंपन्यांमध्येच हा फंड गुंतवणूक करणार आहे. एकूण बाजार भांडवल टक्केवारीच्या तुलनेत भारताचे हेल्थकेअर बाजार भांडवलीमूल्य विकसित आणि उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. भारतात आरोग्यसेवा पायाभूत सुविधाचा होत असलेला विकास तसेच विम्याचे वाढते प्रमाण आणि वैद्यकीय नवोपक्रमाचा विस्तारातून लक्षणीय वाढीची क्षमता दिसून येते.
दोन्ही फंड गुंतवणूकीसाठी (एनएफओ) २ जून ते १६ जून २०२५ या कालावधीदरम्यान खुले राहणार आहेत.
डीएसपी म्युच्युअल फंडचे सीएफए आणि पॅसिव्ह इन्व्हेस्टमेंट्स अँड प्रोडक्ट्सचे प्रमुख अनिल घेलानी नवीन फंडांच्या शुभारंभप्रसंगी बोलताना म्हणाले, “डीएसपी निफ्टी आयटी इंडेक्स फंड आणि डीएसपी निफ्टी हेल्थकेअर इंडेक्स फंड योजनांमुळे गुंतवणूकदारांना वाढ तसेच लवचिकता एकत्रित करणाऱ्या क्षेत्रांमध्ये सहभागी होण्यासाठी संतुलित दृष्टिकोन प्रदान होतो. सध्याच्या अनिश्चित बाजार वातावरणात आयटी आणि हेल्थकेअर सारख्या संरक्षणात्मक क्षेत्रांमध्ये कमी घसरण झालेली आहे. त्यामुळे या क्षेत्रांत आकर्षक परतावा प्रदान करण्याची क्षमता आहे.”
डीएसपी म्युच्यूअल फंडाच्या पॅसिव्ह फंड विभागाचे बिझनेस हेड गुरजीत कालरा याप्रसंगी टिप्पणी करताना म्हणाले, “माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा यासारख्या कमी-बीटा क्षेत्रांचा आपल्या गुंतवणूकीत धोरणात्मक समावेश करून, गुंतवणूकदार अधिक लवचिक आणि कार्यक्षम पोर्टफोलिओ तयार करू शकतात. त्यामुळे त्यांना परतावा वाढण्यास त्याचबरोबर शेअरबाजारातील जोखीम प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यास मदत होऊ शकते. सध्या व्यापक निर्देशांकांमध्ये बचावात्मक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व कमी झालेले आहे. निर्देशांकात कमी मूल्य असलेली आयटी आणि आरोग्यसेवेसारखी क्षेत्रे पुढील वर्षात शेअरबाजारापेक्षा चांगली कामगिरी करतात, हे इतिहास दर्शवितो. आमचा शिस्तबध्द अप्रत्यक्ष गुंतवणूक व्यवस्थापन दृष्टिकोनाचा उद्देश या क्षेत्रांचा अतिशय बारकाईने मागोवा घेणे हा आहे. त्यामुळे कमी अस्थिरता राखताना संरचनात्मक वाढ मिळवण्यास गुंतवणूकदारांना मदत होते.”