ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

“ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा साहित्य वाटप व जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धा संपन्न” – राजू दाभाडे.

"ना. चंद्रकांतदादा पाटील हे एक संवेदनशील नेतृत्व" - संदीप खर्डेकर.

Spread the love

रोलबॉल ह्या पुण्यात जन्मलेल्या खेळाने नवनवीन शिखरे गाठावीत” – श्री. बद्री मूर्ती.

 

पुणे. नामदार चंद्रकांतदादा पाटील हे एक अत्यन्त संवेदनशील नेतृत्व असून त्यांचे राहणीमान, त्यांचे सार्वजनिक वर्तन, त्यांचे समाजाप्रतीचे दातृत्व हे सगळेच राजकारणात दुर्मिळ असून चंद्रकांतदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना होणारा आनंद अवर्णनीय आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले. “दादा” तुम्ही शतायुषी व्हा, तुम्हाला आरोग्यसंपन्नता लाभो आणि अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर “असेच रहा दादा”, सामान्य नागरिकांच्या आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत असेही संदीप खर्डेकर म्हणाले.

तर मा. चंद्रकांतदादा नसते तर पुण्यात रोलबॉल च्या विश्वचषक स्पर्धेचे यशस्वी आयोजन होऊ शकले नसते असे भावपूर्ण उद्गार ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे सर यांनी काढले.

œ

ना.चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रोलबॉल असोसिएशन च्या वतीने जिल्हास्तरीय रोलबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या तसेच विविध शाळेतील क्रीडा शिक्षकांना क्रीडा साहित्याची भेट देण्यात आली ह्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी परांजपे विद्यामंदिर, महेश विद्यालय, कोथरूड सिटी इंटरनॅशनल स्कूल, न्यू इंडिया स्कूल, एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूल निगडी, टाटा मोटर्स स्कूल, पीसीएमसी सेंट उर्सुला स्कूल, पिंपरी चिंचवड फिटनेस फायटर अकॅडमी,ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल,एवरेस्ट इंग्लिश मीडियम स्कूल, अशा विविध शाळांना क्रीडा साहित्याचे वाटप प्रमुख अतिथी श्री बी.जी मूर्ती सर, असोसिएशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप खर्डेकर,रोलबॉल या खेळाचे जनक राजू दाभाडे सर, नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर, भाजपा आय टी प्रकोष्ठ च्या सौ. कल्याणी खर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भ्रमणध्वनी द्वारे उपस्थितांना संबोधित केले व ह्या खेळाच्या वाढीसाठी मी कटिबद्ध असून त्यासाठी सर्वांतोपरी मदत करेन असेही ते म्हणाले.माझा वाढदिवस अश्या अगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केल्याबद्दल त्यांनी सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.

रोलबॉल ह्या खेळासाठी सर्वप्रथम मैदान मी बाल शिक्षण मंदिर येथे उपलब्ध करून दिले आणि आता हा खेळ जगभर लोकप्रिय होत आहे असे प्रमुख अतिथी श्री. बद्री मूर्ती म्हणाले. या खेळाने नवनवीन शिखरे गाठावीत अश्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या.

यावेळी क्रीडा प्रशिक्षकांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

चंद्रकांतदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 17 वर्षा खालील जिल्हा स्तरिय रोलबॉल स्पर्धा पुणे जिल्हा रोलबॉल संघटने मार्फत घेण्यात आल्या. या स्पर्धेत 17 वर्षाखालील ज्युनिअर गटातील 18 संघांनी सहभाग नोंदविला. यामध्ये मुलांचे दहा तर मुलींचे आठ संघ सहभागी होते.

पहिला जूनियर वर्ल्ड कप केनिया येथे होणार असून त्याचे प्रशिक्षण बालेवाडी येथे सुरू आहे.देश भरातील विविध राज्यातील खेळाडू या प्रशिक्षण शिबिरामध्ये सहभागी आहेत,त्या खेळाडूंनी देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला यामध्ये जम्मू कश्मीर, आसाम,उत्तर प्रदेश, दिल्ली महाराष्ट्र,मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू,आंध्र प्रदेश, केरळ,अशा विविध राज्यातील खेळाडू या संघांमध्ये एकत्रित होऊन त्यांचे संघ तयार केले होते ते संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले.

स्पर्धेचे निकाल…

मुलांच्या गटात

1 इंडिया ईस्ट हा संघ प्रथम

2. इंडिया वेस्ट हा संघ द्वितीय

3. महेश विद्यालय कोथरूड तृतीय.

 

मुलींच्या गटात

1. इंडिया ईस्ट प्रथम

2. इंडिया वेस्ट द्वितीय

3. महेश विद्यालय तृतीय.

ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दादासाहेब भोरे,प्रमोद काळे, रफिक इनामदार,प्रभाकर वडवेराव, निलेश शिंदे, जयप्रकाश सिंग इ.यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!