मराठी

अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी

Spread the love

पुणे, : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग(डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत सलामीच्या लढतीत श्वेता मानेच्या उपयुक्त नाबाद ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने सोलापूर स्मॅशर्स संघाचा ५ गडी राखून पराभव करत विजयी सलामी दिली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना सोलापूर स्मॅशर्स संघाने २० षटकात ६बाद १३९ धावा केल्या. ईश्वरी अवसरे(८), ईश्वरी सावकार(१) हे सलामीची जोडी झटपट झाल्याने सोलापूर संघाशी सुरुवात फारशी चांगली झाली नाही. त्यानंतर कर्णधार तेजल हसबनीसने ५४चेंडूत ६९ धावांची संयमी खेळी करत संघाचा डाव सावरला. तिने ५चौकार व २ षटकार खेचले. तेजल व मुक्ता मगरे यांनी ८५ चेंडूत १०१ धावांची भागीदारी केली. मुक्ता मगरेने ४६चेंडूत १चौकारासह ३६ धावा केल्या.

१३९ धावांचे आव्हान पुणे वॉरियर्स संघाने १९.४ षटकात ५बाद १४२धावा करून पूर्ण केले. यात सुहानी कहांडलने ३८चेंडूत ४चौकाराच्या मदतीने ३६धावा, ख़ुशी मुल्लाने २३ धावा केल्या. या सलामीच्या जोडीने ५७ चेंडूत ५४ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर श्वेता माने हिने २४ चेंडूत ५चौकाराच्या मदतीने नाबाद ३८ धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. श्वेता माने व अनुजा पाटील(३० धावा) यांनी तिसऱ्या गड्यासाठी ४३चेंडूत ६३ धावांची महत्वपूर्ण खेळी करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

संक्षिप्त धावफलक
सोलापूर स्मॅशर्स: २०षटकात ६बाद १३९धावा(तेजल हसबनीस ६९(५४,५x४,२x६), मुक्ता मगरे ३६(४६,१x४), ख़ुशी मुल्ला २-१९, अनुजा पाटील १-१९, चिन्मयी बोरपाळे १-२६) पराभुत वि.पुणे वॉरियर्स: १९.४ षटकात ५बाद १४२धावा (श्वेता माने नाबाद ३८(२४,५x४), सुहानी कहांडल ३६(३८,४x४), अनुजा पाटील ३०(२६,३x४), ख़ुशी मुल्ला २३, ईश्वरी अवसरे २-२२, आरती केदार १-३३);सामनावीर – श्वेता माने.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button