पंचांगातील ग्रहस्थितीवर शुभ अशुभ परिणाम ठरलेले असतात” – मोहनराव दाते.
"हा महाराष्ट्र अजेय योद्धा बाजीराव पेशवा, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यासह सर्व जातीतील महापुरुषांचा देखील आहे" - संदीप खर्डेकर.

याज्ञवलक्य आश्रमाचा 98 वा वर्धापनदिन साजरा – संदीप खर्डेकर यांचा “महर्षी याज्ञवलक्य”, मंजुश्री खर्डेकर यांचा “मुक्ताई” व मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचा “बालगंधर्व” पुरस्काराने सन्मान.
पुणे. जग विषमतेवर चालते विवाहबंधन टिकून राहण्याकरिता एक आक्रमक असल्यास दुसरी बाजु समजुतदार असणे गरजेचे असते असे मत व्यक्त करताना दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी “घरातील नात्याची संख्या कमी हाेत चालली आहे घरातील साेडून आता बाहेरील व्यक्तीला काका मामा म्हणन्याची वेळ आली आहे त्यामुळे आता एकाच मुलावर न थांबता बहिणीला भाऊ आणि भावाला किमान एक तरी बहिण असावी” असे मत ही त्यांनी व्यक्त केले.
पालकांनी मुलांना लवरात लवकर सेटल हाेऊन याेग्य वयातच लग्न करण्यास सांगितले पाहिजे असे सांगतानाच “ग्रह ताऱ्या नुसार लगाच्या वेळी मुलांच्या पेक्षा मुलगी लहानच हवी,पंचागातील ग्रहस्थितीवर शुभ अशुभ परिणाम ठरलेले असतात,असे मत ही दाते पंचांगकर्ते मोहनराव दाते यांनी व्यक्त केले.
याज्ञवलक्य आश्रमाच्या 98 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते संदीप खर्डेकर यांना महर्षी याज्ञवलक्य पुरस्काराने, सौ. मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांना बालगंधर्व पुरस्काराने, सौ. मंजुश्री खर्डेकर यांना मुक्ताई पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार हा सतीश वैद्य,सौ. सुषमा वैद्य, श्री. अरुण महाजनी यांना तर क्रियाशील कार्यकर्ता पुरस्काराने श्री. बाळकृष्ण देव आणि सौ. वीणा ठकार यांना गौरविण्यात आले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना संदीप खर्डेकर म्हणाले की जातीपाती मध्ये विभागलेला समाज हा कधीच प्रगती करू शकत नाही, आम्ही कधीच जातपात मानली नाही पण आज ज्या पद्धतीने ब्राह्मण समाजाला टार्गेट करण्यात येते, अवमानित करण्यात येते हे अत्यंत दुर्दैवी आहे. ज्याप्रमाणे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे,महात्मा ज्योतिबा फुले,राजर्षी शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे तसाच हा महाराष्ट्र अजेय योद्धा बाजीराव पेशवा, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, चापेकर बंधू, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे यासह अनेक महनीय व्यक्तींचा देखील आहे, त्याचबरोबर हा महाराष्ट्र राणी लक्ष्मीबाई, महादजी शिंदे, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे यासह विविध ज्ञातीतील थोर व्यक्तिमत्वांचा देखील आहे असेही खर्डेकर म्हणाले. सर्व जातीतील महापुरुषांचे महाराष्ट्र उभारणीत योगदान आहे त्यामुळे ह्या राज्याला जातीपातीत विभागणे चुकीचे असल्याचे मत ही श्री. खर्डेकर यांनी व्यक्त केले.जातीभेद विरहित एकसंघ हिंदू समाज ही काळाची गरज असल्याचेही खर्डेकर म्हणाले.महर्षी याज्ञवलक्य पुरस्कार हा अधिक चांगले सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा देईल असेही ते म्हणाले.
सौ.मुक्ता गरसोळे कुलकर्णी म्हणाल्या “याज्ञवल्क्य स्मृती कायद्याचे शिक्षण देणारा ग्रंथ ,याज्ञवल्क्य आश्रमाशी बालपणापासून नाते असल्याने संस्थेने दिलेल्या बालगंधर्व पुरस्कार स्विकारताना आनंद होत आहे, तसेच त्यांनी संत साहित्यामधील अनेक उदाहरणे देऊन गुरू शिष्य नाते, संत महती संत वाड्गमय,याचे महत्व सर्व श्रोत्यांसमोर विशद केले. अत्यन्त ओघवत्या शैलीत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सौ. मंजुश्री खर्डेकर यांनीही सत्काराला उत्तर देताना सांगितलं की “मी पक्ष देईल ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली, अगदी बूथ स्तरापासून काम केले त्यामुळे पक्षाने मला नगरसेविका,शिक्षण समिती अध्यक्ष अश्या विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. मी नागरिकांना केंद्रस्थानी ठेऊन त्यांना हवी असलेली आणि त्यांनी सुचविलेली विकास कामं केल्यामुळेच मी चांगले कामं करू शकले असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
सदर कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष ज. ल. नगरकर,कार्यवाह प्रमोद चंद्रात्रेय, सुचेता पाताळे , अरूण खेडकर , मनोज तारे , ज्ञानेश्वर बेल्हे, उल्हास पाठक, सुजाता मवाळ,तृप्ती तारे,विमल भालेराव, प्रशांत पिंपरीकर,धनंजय ठुसे नचिकेत बेरी,सुषमा देव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशश्री पुणेकर यांनी केले. नीलिमा पिंपरीकर यांच्या पसायदान गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.