आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम.

पुणे : आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या फायद्यांना प्रोत्साहन देण्याच्या आपल्या ध्येयाला पुढे नेत, देशातील सर्वात मोठ्या सायन्स-बेस्ड आयुर्वेद कंपनी डाबर इंडिया लिमिटेडने पुदिना (मिंट) या वनस्पतीला ‘वंडर हर्ब’ म्हणून गौरवण्यासाठी एक विशेष मोहिम सुरू केली आहे. ही मोहिम पुण्यात आयोजित एका विशेष कार्यक्रमात उद्घाटित करण्यात आली.
या कार्यक्रमाला डॉ. काजल कोडितकर, डॉ. निकिता जगताप आणि डाबर इंडिया लिमिटेडचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स मॅनेजर दिनेश कुमार उपस्थित होते.
डॉ. निकिता जगताप यांनी सांगितले की, पुदिनामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे विशेषतः उन्हाळ्यात पचनासाठी अत्यंत लाभदायक ठरतात. तापमानात झालेल्या वाढीमुळे आणि सततच्या उष्णतेच्या लाटा यामुळे उन्हाळ्यात आरोग्यविषयक समस्या सामान्य झाल्या आहेत. अशा काळात, जे लोक दिवसभर उन्हामध्ये असतात किंवा उन्हाळ्यातील त्रास सहन करतात, त्यांच्यासाठी पुदिन्याचा वापर डाबरकडून सुचविण्यात येत आहे.
या वेळी डाबर इंडिया लिमिटेडचे हेल्थकेअर मार्केटिंग प्रमुख अजय परिहार म्हणाले, “आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोक एकाच वेळी अनेक कामे करत आहेत आणि त्यांना नैसर्गिक व प्रभावी उपायांची गरज आहे. डाबर ही देशातील सर्वात विश्वासार्ह आरोग्य सेवा देणारी कंपनी म्हणून पारंपरिक आयुर्वेदाच्या माध्यमातून दैनंदिन आरोग्य समस्यांवर उपाय देण्याचे आपले वचन अजून बळकट करत आहे. पुदिन हरा हा विविध पचनसंस्थेच्या तक्रारींवर प्रभावी उपाय ठरला आहे. उन्हाळ्यात प्रचलित असलेल्या अनेक समस्यांवर – अपचन, गॅस आणि आम्लपित्त यांसारख्या तक्रारींवर हे उत्तम काम करते.”
डॉ. निकिता जगताप पुढे म्हणाल्या, “प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आधुनिक आजारांवर उपाय सांगितलेले आहेत. पुदिन्याचा वापर गेली 3,000 वर्षे केला जात आहे आणि पचनसंस्थेसाठी त्याचे उपयोग लक्षात घेता त्याला ‘वंडर हर्ब’ म्हटले गेले आहे. पुदिन्यातील मेंटॉल पाचक एन्झाइम्सला उत्तेजित करते, पोटाचे स्नायू सैल करतं आणि अपचन व गॅस याची शक्यता कमी करते. हे पोटदुखी, आम्लपित्त आणि फुगण्यावरही शांत करणारे प्रभाव देते.”
आज बाजारात उपलब्ध अनेक अँटासिड्समध्ये अॅल्युमिनियम मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड यासारखे रासायनिक घटक असतात, जे सतत घेतल्यास शरीरावर घातक परिणाम करू शकतात. याच्या तुलनेत, डाबरचे पुदिन हरा हे शंभर वर्षांहून अधिक जुने, पुदिन्याच्या अर्काने समृद्ध, नैसर्गिक आयुर्वेदिक औषध आहे, जे गॅस, अपचन, पोटदुखी आणि आम्लपित्त यावर त्वरीत व प्रभावी आराम देते. पुदिन हरा टॅबलेट, लिक्विड, पावडर आणि पुदिन हरा फिज या स्वरूपात उपलब्ध आहे – जे रासायनिक अँटासिड्सला एक नैसर्गिक पर्याय आहे.
______________
पुदिन हराबद्दल :
डाबर पुदिन हरा मध्ये पुदिन्याचा अर्क मुख्य घटक आहे. हे अपचन, गॅस, पोटदुखी यासारख्या पचनविकारांवर जलद आणि प्रभावी आराम देते. 100% नैसर्गिक घटकांपासून बनवलेले हे औषध पूर्णतः सुरक्षित असून लोकांचा विश्वासार्ह पर्याय आहे.