श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापूजेचा उत्सव उत्साहात संपन्न

आळंदी-पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने भक्तिभावपूर्ण वातावरणात श्री पांडुरंग आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींची महापूजा पार पडली. या पूजेचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका ट्रस्टच्या वतीने करण्यात आले होते.
महापूजा, अभिषेक आणि हरिपाठाचे आयोजन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर तसेच संपूर्ण तापकीर परिवाराने पारंपरिक विधी आणि भक्तिभाव जपत श्रींची महापूजा केली. श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि माऊलींच्या मूर्तींना दूध, दही, मध, सुगंधी जलाने अभिषेक करण्यात आला. गजर, अभिषेक, आरती आणि हरिनामाच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिरसात न्हालेला दिसला.
सांस्कृतिक कार्यक्रम आणि कीर्तनसेवा यावेळी सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत ह.भ.प. श्री गंगाधार स्वामी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन, संध्याकाळी ५:०० ते ६:०० हरिपाठ, आणि रात्री ९:०० ते ११:०० ‘हरी जागर’ भक्ती पुर्ण संपन्न..
भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती या भक्तिमय कार्यक्रमात शिवाजी गराडे, मुक्ता गराडे, ह.भ.प. रमेश घोंगडे, राजेंद्र नाणेकर, हर्षल अरबट, शांताराम तापकीर, संतोप पठारे, चंदकांत मोरे आदींसह परिसरातील असंख्य माऊलीभक्तांनी उपस्थिती लावली.
महाप्रसाद आणि आकर्षक सजावट महापूजेनंतर श्रींना महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला व उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. मंदिर परिसर फुलांची आकर्षक सजावट, रांगोळ्या आणि दीपसज्जेने विशेष सजवण्यात आला होता.