मुख्यमंत्री फडणवीसांनी अक्कलकोट घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून ‘गृहमंत्री’ पदाचा राजीनामा द्यावा … काँग्रेस’ची मागणी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या आणि बहुजन व पिडीत समाजासाठी झटणाऱ्या श्री प्रविणदादा गायकवाडांवर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध..!
श्री छत्रपती संभाजी महाराजांचे नांवे श्री प्रविणदादा गायकवाड चालवत असलेली संघटना अनेक वर्षांपासून काम करीत आहे. संस्थेच्या नावात श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे मागे छत्रपती लावण्यास प्रवीण गायकवाड यांना कोणतीच हरकत नव्हती, मात्र धर्नादाय आयुक्त कार्यालयात तशा प्रकारच्या संस्थेची नोंदणी मुळात झाल्याने, या नावात बदल करू शकत नसल्याची तांत्रीक अडचण असल्याचे समोर आले होते.
त्यामुळे केवळ निमित्त साधून, भाजप युवा मोर्च्याचा पदाधीकारी व सहकार्यांनी केलेला भ्याड हल्ला निषेधार्य असून ‘राज्यातील कायदा-सुव्यवस्था लयाला गेल्याचे’ स्पष्ट द्योतक आहे.
अहिल्यानगर चा छिंदम, कोरटकर, सोलापूरकर, राज्यपाल कोश्यारी, कर्नाटकचे भाजर मुख्यमंत्री, सुधांशू त्रिवेदी इ नी वेळोवेळी केलेला शिव छत्रपतींच्या अवमानावर व भाजप मातृ संस्थेच्या तत्कालीन नेत्यांनी श्री शंभू राजेंच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवले त्यावर भाजप युवा नेते गप्प का (?) असा संतप्त सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी उपस्थित केला..
संतोष देशमुख, सोमनाथ सुर्यवंशी, बदलापूर चिमुरडीवरील अत्याचार, अक्षय शिंदे फेक एन्कांउटर इ विषय अद्याप कायदेशीर पुर्णत्वास येत नाही.
राज्यात कोयता गँग, ठाणे पोलीस स्टेशन मघील गोळीबार, महीला अत्याचार व अक्कलकोट मधील आजच्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून, मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘गृहमंत्री पदाचा’ तातडीने राजीनामा देण्याची मागणी काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.
या हल्लेखोरांवर कारवाई झाली नाही तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा ईशारा वजा सल्ला ही दिला.
राज्यातील बिघडत्या कायदा – सुव्यवस्थे विषयी व अस्मिते विषयी जरा ही चाड असेल तर ‘महायुतीच्या सत्तेतील’ दोव्ही पक्षांनी, फडणवीसांकडून ‘गृहमंत्री पदाचा’ राजीनामा घ्यावा.. असे आवाहन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
अन्यथा या पुढे अशा घटनांना इतरांनाही सामोरे जावे लागेल काय(?) याचा गांभीर्याने विचार करावा… अशी पुस्तीही त्यांनी जोडली.



