मराठी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात पहिली अत्याधुनिक कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील पाठपुराव्याला यश

Spread the love

बारामती, : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात ‘मेडियल पिव्होट’ (Medial Pivot) गुडघ्याचे इम्प्लांट (सांधे) वापरून शहरातील पहिली रोबोटिक कृत्रिम सांधरोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. बारामती येथील वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रात ही शस्त्रक्रिया गरजू रुग्णांकरिता दिलासा देणारी बाब आहे.

बदलत्या काळात तालुक्यातील रुग्णांना अत्याधूनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करुन उपचार मिळाले पाहिजे, याकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा सतत पाठपुरावा असतो. प्रयोगशील, प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या बारामती शहरात अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने हे एक ऐतिहासक, क्रांतीकारी पाऊल आहे. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय तंत्रज्ञानातील अत्याधुनिक पद्धती स्वीकारण्यासोबतच येथील रुग्णांना उच्चतम-गुणवत्तेच्या वैद्यकीय सोई-सुविधा अधिक सुलभतेने मिळण्यासाठी पर्याय असल्याचे दर्शवून देते.

डॉ. गिरीश भालेराव, ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती येथील शासकीय रुग्णालयातील कुशल सर्जिकल पथकाने ही कठीण, जटील अग्रगण्य शस्त्रक्रिया केली. रोबोटिक तंत्रज्ञानाची बिनचूक कार्यप्रणाली वापरून डॉक्टर्सनी बॉयराड मेडीसीस (Biorad Medisys) या कंपनीचा मेडियल पिव्होट ( Medial Pivot) गुडघा प्रत्यारोपित केला. जो गुडघ्याच्या नैसर्गिक हालचालीची नक्कल करून सांधरोपण शस्त्रक्रिया अतिशय सुलभ करण्यासाठी डिझाइन केलेला इम्प्लांट आहे.

शस्त्रक्रियेमध्ये वापरला जाणारा मेडिअल पायवोट हा गुडघ्याचा कृत्रिम सांधा शस्त्रक्रियेनंतर अधिक नैसर्गिक आणि सहज कार्य करण्यासाठी रचना केलेला आहे. त्याची रचना संपूर्ण हालचालीच्या श्रेणीमध्ये गुडघ्याच्या आतील बाजूस एक स्थिर पिव्होट पॉइंट प्रदान करते, ज्यामुळे निरोगी गुडघा नैसर्गिकरित्या हालचाल करतो त्या पद्धतीने बारकाईने प्रतिकृती बनवते. रोबोटिक सहाय्य सर्जनना रिअल-टाइम डेटा आणि इम्प्लांट प्लेसमेंटवर अचूक नियंत्रण प्रदान करून इम्प्लांटची अचूकता आणि टिकाऊपणा आणखी वाढवते. ज्यामुळे वैयक्तिक रुग्णाच्या शरीर रचनेनानुसार सदर इंप्लांट अचूक कार्यरत होते.

डॉ. गिरीश भालेराव, ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन: ‘बारामतीमधील रुग्णांना पहिल्यांदाच हे प्रगत रोबोटिक तंत्रज्ञान आणि मेडिअल पिव्होट गुडघा असे लाभ देऊ करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. या बाबींची जोड दिल्यामुळे आम्हाला उच्च पातळीची अचूकता प्राप्त करता येते आणि प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार गुडघा इंप्लांट तयार करता येते.’
0000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!