केशवनगर येथे तालुका स्तरीय लोकशाही दिनाचे 21 जुलै रोजी आयोजन

पुणे, : पुणे महानगरपालिका समाविष्ठ 34 गाव समितीचे सदस्य विकी शिवाजी माने यांनी पुणे शहर तहसीलस्तरीय लोकशाही दिनाचे 21 जुलै रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत बुध्दविहार बस थांबा, रेणुका माता मंदिर जवळ, केशवनगर, मुंढवा येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री यांनी सामान्य नागरिकांचे दैनदिन जीवन सुकर व्हावे या करिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला आहे. या कारणास्तव नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थनिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिवस हा शासन आपले दारी म्हणून आयोजित करण्यात यावा असे या परिपत्रकाद्वारे आदेशित करण्यात आलेले आहे.
तरी पुणे शहरातील नागरीकांनी त्यांच्या समस्याबाबत लेखी स्वरुपात अर्ज सदर दिवशी दाखल करावेत, असे आवाहनही श्री. येवले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
0000