आयबीएसएफ जागतिक १७ वर्षाखालील स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा
महाराष्ट्राच्या आरव संचेती याचे स्पर्धेतील आव्हान कायम !!

बाहरीन येथील मनामा येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघामध्ये पुण्याचा आरव संचेती भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करत आहे. १४ वर्षीय आरव हा संघातील सर्वात लहान खेळाडू आहे. अ गटाच्या पहिल्या सामन्यामध्ये आरवला ओमानच्या मुतासिम अल सादी याच्याकडून ३-२ असा पराभव स्विकारावा लागला. सामन्यामध्ये आरव ०-२ असा पिछाडीवर होता. त्यानंतर त्याने सलग दोन फ्रेम जिंकून सामन्यामध्ये २-२ अशी बरोबरी निर्माण केली. अंतिम आणि निर्णायक फ्रेममध्ये आरवला मुतासिमकडून पराभव स्विकारावा लागला.
दुसऱ्या सामन्यामध्ये आरव याने बाहरीनच्या फैझल अलमालिकी याचा ३-० असा सरळ फ्रेममध्ये पराभव करून स्पर्धेतील पहिल्या विजयासह आपले आव्हान कायम ठेवले. अ गटातून दुसऱ्या फेरीमध्ये पहिले दोन खेळाडू पात्र होऊ शकणार असून आरव दोन सामन्यांनंतर दुसऱ्या स्थानावर असून पहिल्या स्थानावर वेल्स्च्या रिले पॉवेल आहे.
भारताचा राहुल विल्यम्स् यानेसुद्धा ड गटातून खेळताना एक विजय आणि एक पराभव अशी कामगिरी केली आहे. वैभव चढ्ढा, भाव्या पिपलिया आणि आरव झायद यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारतीय संघामध्ये आरव (महाराष्ट्र) याच्यासह भाव्य पिपालिया (गुजरात), आरव जयद (कर्नाटक), राहूल विल्यम्स् (तामिळनाडू) आणि वैभव चढ्ढा (तेलंगणा) यांचा समावेश आहे. अशोक शांडिल्या हे संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पहात आहेत.
स्पर्धेचा निकालः गटसाखळी फेरीः अ गटः
मुतासिम अल सादी (ओमान) वि.वि. आरव संचेती (भारत) ३-२;
आरव संचेती (भारत) वि.वि. फैझल अलमालिकी (बाहरीन) ३-०;
क्वान चुन चेन (चीन) वि.वि. राहुल विल्यम्स् (भारत) ३-१
राहुल विल्यम्स् (भारत) वि.वि. अहमद नोमान (अफगाणिस्तान) ३-२;
काई नआम पांग (चीन) वि.वि. वैभव चढ्ढा (भारत) ३-०;
क्रिझिस्टॉफ झॅपनिक (पोलंड) वि.वि. भाव्या पिपलिया (भारत) ३-१;
डेव्हिड निस्टोर (रोमानिया) वि.वि. आरव जायद (भारत) ३-२.