मराठी

फेडरल बँकेच्या ‘सह्याद्री रन मॅरेथ़ॉनची’ नावनोंदणी सुरु

- येत्या २३ नोव्हेंबर २०२५ ला स्पर्धेचे आयोजन

Spread the love

– प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमण सह्याद्री रन मॅरेथ़ॉनचे ब्रँड अँबेसेडर
पुणे, : फेडरल बँक तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या पुणे मॅरेथॉनची दुसरी आवृत्ती म्हणजेच ‘सह्याद्री रन’ येत्या २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी आयोजित केली आहे. स्ट्रायडर्सच्या सहकार्याने फेडरल बँक पुणे मॅरेथॉन आयोजित केली जाणार असून या मॅरेथॉनसाठी नावनोंदणीला आजपासून सुरवात करण्यात आली आहे. प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमण या मॅरेथ़ॉन रनचे ब्रँड अँबेसेडर असणार आहेत. पुणेकरांचा सळसळता उत्साह, निसर्गरम्य सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत वाढती जागरुकता साजरी करण्याचे या मॅरेथॉनचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या स्पर्धेत चार गट आहेत. पूर्ण मॅरेथॉन (४२ किमी), हाफ मॅरेथॉन (२१ किमी), १० किमी आणि ५ किमी असे चार गट असून यासाठी नोंदणी शुल्क आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले धावपटू https://stridersevents.in/events/info?FederalBankPuneMarathon2025. येथे ऑनलाईन नोंदणी करू शकतात. यासाठी ६०० रुपये जीएसटीसह नोंदणी शुल्क आहे.
या मॅरेथ़ॉन रनचे ब्रँड अँबेसेडर आणि अभिनेता मिलिंद सोमण म्हणाले, “फेडरल बँकेच्या पहिल्या आवृत्तीत अविश्वसनीय ऊर्जा आणि सहभाग होता. पुणे खरोखरच एकत्र धावणारे शहर आहे, हे त्या मॅरेथॉन रनमधून सिध्द झाले. या मॅरेथॉन रनच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. अनुभवी धावपटू आणि पहिल्यांदा धावणाऱ्यांना या रनसाठी नावनोंदणी करण्यासाठी त्याचबरोबर या प्रेरणादायी आयोजनाचा भाग होण्यासाठी मी सर्वांना आमंत्रित करत आहे. यंदाची सह्याद्री मॅरेथ़ॉन ही आपण सारेजण आणखी भव्य, सक्षम आणि अविस्मरणीय बनवू या.”
फेडरल बँकेचे मुख्य विपणन अधिकारी एम. व्ही. एस. मूर्ती म्हणाले, ” मॅरेथॉन रनच्या पहिल्या आवृत्तीला आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सीझन टू अधिक भव्य, धाडसी आणि अधिक उत्साहवर्धक करण्याचे आश्वासन मी देत आहे. आम्ही सर्व उत्साही मॅरेथॉन धावपटूंना २३ नोव्हेंबर रोजी या सोहळ्यात सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!