श्रीनिवास जोशी, सविता मालपेकर, योगी निरंजननाथ यांना मंडई म्हसोबा ट्रस्टचे भूषण पुरस्कार
अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट ; माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा ; संजय चितळे, निलेश भिंताडे देखील मानकरी

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्ट तर्फे यंदा दि. २२ ते २६ जुलै २०२५ दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे. त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार प्रख्यात गायक श्रीनिवास भीमसेन जोशी, ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेला ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सारिका निंबाळकर आदी उपस्थित होते.

निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार चितळे बंधू चे संचालक संजय चितळे, उद्योग भूषण पुरस्कार आर.डी.डेव्हलपर्सचे संचालक निलेश भिंताडे, कला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, संगीत भूषण पुरस्कार प्रख्यात गायक श्रीनिवास भीमसेन जोशी, धार्मिक भूषण पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार प्रसिद्ध पत्रकार व संपादक आनंद अग्रवाल यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूरच्या कार्याध्यक्ष रागिणी खडके यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.
सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,फळांची करंडी, महावस्त्र आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मंडईतील बुरुड आळी येथे हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक २६ जुलै रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी महिलांसाठी होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा व चालता बोलता हा कार्यक्रम शनिवारी, दुपारी १२ वाजता होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना एकूण २ लाख ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत.
वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे. मंडई बुरूड आळीतील मुख्य मंदिरासमोरील उत्सवाचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होणार असून मंगळवार, दि. २२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सदाशिव पेठेतील पुणे विद्यार्थी गृहाच्या महाराष्ट्र विद्यालयातील ५०० गरजवंत विद्यार्थ्यांना १ लाख २५ हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्य व भोजन देण्यात येणार आहे.
बुधवार, दि. २३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सारथ्य फाऊंडेशन, विवेकानंद केंद्र आणि आनंदग्राम गुरुकुल निमगाव या तीन सामाजिक संस्थांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत व विद्यार्थी भोजन कार्यक्रम होईल. शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दिव्यांग प्रतिष्ठान चिंचवडगाव, यशस्वी महिला सामाजिक संस्था, साईगुरु सेवा संस्था न-हे सुकन्या अंध मुलींचे महिलाश्रम या तीन सामाजिक संस्थांना ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत व भोजन कार्यक्रम होईल. उत्सवाची सांगता सद्गुरु बाळूमामा देवालय आदमापूरचे प.पू. कृष्णा डोणे महाराज (वाघापुरे) यांच्या हस्ते शनिवार, दि. २६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता महाआरतीने होणार आहे.
संपूर्ण उत्सवातील विविध कार्यक्रमांना गृह राज्यमंत्री योगेश कदम, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष अॅड.सुरेश कौदरे, श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, आंतरराष्ट्रीय मंदिर महासमितीचे गिरीश कुलकर्णी, राज्याच्या अंमलीपदार्थ विरोधी फोर्सचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पुण्याचे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अॅड.सुषमा अंधारे, कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडिया, रांका ज्वेलर्सचे फत्तेचंद रांका, पीएनजी चे पराग गाडगीळ, आर. के.लुंकड हाउसिंग कॉ. चे संचालक रमणशेठ लुंकड, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांसह कला क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उत्सवात ५ दिवस अन्नदान सेवा, सकाळी रुद्राभिषेक व रुद्रयाग आणि दुपारी शहर व जिल्ह्यातील भजनी मंडळाची सेवा तसेच ढोल ताशा वादन देखील होणार आहे.
* *दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव*
गुरुवार, दिनांक २४ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता मंडई बुरुड आळीतील मंदिरात दीप अमावस्येनिमित्त ११०० दिव्यांचा दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी हिंदू धर्मगुरु प.पू. कालीपूत्र कालीचरण महाराज उपस्थित राहणार आहेत. फिरत्या रंगीबेरंगी दिव्यांची व फुलांची आकर्षक आरास यानिमित्ताने होणार असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.



