साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने साजरा करून आदरांजली

खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीत साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटनांच्या वतीने साजरा करून आदरांजली वाहण्यात आली खडकीतील महात्मा गांधी चौकात काँग्रेस आय पक्षाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला आंतरराष्ट्रीय धावपटू सचिन शिराळे तसेच राष्ट्रीय मुष्टियोद्धा खेळाडू नरेश लखन यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली यावेळी विविध राजकीय पक्षातील तसेच क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन खडकी ब्लॉक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सेलवराज अँथोनी यांनी केले होते

तसेच अखिल खडकी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात संस्थापक अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर सदस्य गोपाळभाऊ वाघमारे, रिपब्लिकन पक्षाचे रिकेश पिल्ले काँग्रेस पक्षाचे सेलवराज अँथोनी व इतर मान्यवर उपस्थित होते.