आलंदीताजा खबरधर्मब्रेकिंग न्यूज़मराठी

ज्ञानोबा – तुकाराम पालख्याचे थोरल्या पादुका मंदिरात हरिनाम गजरात स्वागत

Spread the love

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील वडमुखवाडीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा प्रथा व परंपराचे पालन करीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट मध्ये परतीचे प्रवासा दरम्यान विसाव्यास विसावला. हरिनाम गजरात सोहळ्याचे परंपरांचे पालन करीत संस्थान ट्रस्ट ने स्वागत केले. यावेळी माऊली पादुकासह श्री संत तुकाराम महाराज पादुकाची पुजा आणि आरती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते झाली. यावेळी पादुकांना पुष्पहार, तुळशी हार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी चोपदार बंधुच्या वतीने आरती करण्यात आली. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे पालखी सोहळा प्रमुख डॉ भावार्थ देखणे, संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त विधितज्ञ राजेंद्र उमाप, रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील, चैतन्य महाराज महाराज कबीरबुवा लोढे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बबळासाहेब चोपदार बंधुसह मान्यवरांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते हरिनाम गजरात झाला. भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली होती.


संत तुकाराम महाराज पालखीचे थोरल्या पादुका मंदिरात स्वागत सत्कार सोहळा
श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि पादुकांची आरती श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते झाली. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त उमेश महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त विक्रमसिंह महाराज मोरे, विश्वस्त गणेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, वैभव महाराज मोरे यांचा देवस्थान तर्फे शाल, श्रीफळ व उपरणे देऊन ट्रस्ट अध्यक्ष अँड विष्णू तापकीर, खजिनदार दत्तात्रय गायकवाड यांच्या वतीने सत्कार आणि स्वागत करण्यात आले. मंदिरास पुष्प सजावट संतोष वाळके यांच्या वतीने करण्यात आली .मंदिर परिसरात रांगोळी रोहीणी परतगुल्ले यांनी लक्षवेधी काढत भाविकांचे लक्ष वेधले. यावेळी भाविक भक्तांच्या वतीने पालख्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दर्शनास मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती. दर्शनास आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापुसाहेब ढेरे यांनी पोलीस बंदोबसत तैनात करीत भाविकांना सुरक्षित कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांचे दर्शनाचे नियोजन केले. आळंदीतील स्वकाम सेवा कार्यकारी मंडळाचे वतीने दर्शनबारीचे नियोजन परिश्रम पूर्वक करण्यात आले. देहु संस्थानचे अध्यक्ष जालींदार महाराज मोरे यांचा सत्कार श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!