
सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस् क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत विशाल पवार याने फटकावलेल्या ७१ धावांच्या जोरावर कॅप क्रुसडर्स संघाने रियुनायटेड क्रिकेट क्लबचा १५९ धावांनी सहज पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना कॅप क्रुसडर्स संघाने २७८ धावांचे लक्ष्य उभे केले. वासिम अहमद योन ७३ धावांची तर, विशाल पवार याने ७१ धावांची स्फोटक खेळी केली. याशिवाय आदित्य साखरदंडे (४३ धावा) आणि परेश कोठोरी (२८ धावा) यांनीही धावांचे योगदान दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना रियुनायटेड क्रिकेट क्लबचा डाव ११९ धावांवर संपुष्टात आला. पारस जैन आणि सिद्धार्थ दुबे यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून संघाचा विजय साकार केला.
कपिल गुप्ता याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर गट्स अँड ग्लोरी संघाने रियुनाटेड क्रिकेट क्लबचा ३ गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना रियुनाटेड क्रिकेट क्लबने १९९ धावांचे लक्ष्य उभे केले. शुभम खटाळे (६३ धावा), देराज भट (४३ धावा) आणि संकेत शिंदे (३५ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. कपिल गुप्ता याने ३१ धावांत ३ गडी बाद केले. हे लक्ष्य गट्स अँड ग्लोरी संघाने १९.१ षटकात व ७ गडी गमावून पूर्ण केले. कुणाल गुप्ता याने ६५ धावांची तर, सुयश भट याने ४५ धावांची खेळी करून संघाचा विजय साकार केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
कॅप क्रुसडर्सः १९.२ षटकात १० गडी बाद २७८ धावा (वासिम अहमद ७३ (२९, ५ चौकार, ७ षटकार), विशाल पवार ७१ (१९, ६ चौकार, ७ षटकार), आदित्य साखरदंडे ४३, परेश कोठोरी २८, विशाल गुप्ता ४-४७, निखील कदम ३-५३) वि.वि. रियुनायटेड क्रिकेट क्लबः १९.१ षटकात १० गडी बाद ११९ धावा (शुभम मकसारे ४०, पारस जैन ३-१८, सिद्धार्थ दुबे ३-२३); सामनावीरः विशाल पवार;
रियुनाटेड क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद १९९ धावा (शुभम खटाळे ६३ (३८, ६ चौकार, ४ षटकार), देराज भट ४३, संकेत शिंदे ३५, कपिल गुप्ता ३-३१, गौरव धनवटे २-९) पराभूत वि. गट्स अँड ग्लोरीः १९.१ षटकात ७ गडी बाद २०० धावा (कुणाल गुप्ता ६५ (४२, ८ चौकार, ३ षटकार), सुयश भट ४५, रितेश साळी २०, देराज भट ३-२९, निखील कदम ३-२८); सामनावीरः कपिल गुप्ता.