
भाजप आळंदी शहर व आळंदी ग्रामीण मंडळाचा लक्षवेधी उपक्रम
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ उर्फ देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसा निमित्त राज्यात आयोजित महारक्तदान शिबिरांतर्गत भाजपा आळंदी शहर मंडळ आणि आळंदी ग्रामीण मंडळ आयोजित रक्तदान शिबिरास सामाजिक बांधिलकीतून रक्तदात्यांनी रक्तदानास उत्साही प्रतिसाद देत रक्तदान केले. आळंदीत आयोजित शिबिरांत ३०४ रक्तदात्यांनी रक्तदान करीत शिबिरास प्रतिसाद दिला.
आळंदी येथील श्री भैरवनाथ चौकातील ज्ञानदर्शन धर्मशाळेत भाजपा आळंदी मंडळाचे वतीने आणि साई मंगल कार्यालयात भाजपा आळंदी ग्रामीणचे वतीने मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे वाढदिवसा निमित्त रक्तदान श्रेष्ठदान, वाचावी गरजू रुग्नांचे प्राण, आरोग्य सेवेतील सामाजिक बांधिलकीचे कार्यास आळंदी शहर पंचक्रोशी मंडळ प्रमुख माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, आळंदी ग्रामीण पंचक्रोशी भाजपा मंडळ प्रमुख अमोल वीरकर यांनी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख संजय घुंडरे पाटील, माजी उपनगराध्यक्ष रामदास भोसले, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, मंडूबाबा पालवे, अभिजित उमरगेकर, रेणुकादास पांचाळ, पश्चिम महाराष्ट्र आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष संजयदादा घुंडरे पाटील, माजी उपाध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, सचिन गिलबिले, माजी नगरसेवक अशोकराव उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, दिनेश घुले, सचिन काळे, माजी नगरसेविका रुक्मिणी कांबळे, गणेश राहणे, माजी नगराध्यक्ष. सुरेश वडगावकर, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस. अँड.आकाश जोशी, वासुदेव तुर्की, संकेत वाघमारे, उद्योजक श्याम कोलन, अभिषेक उमरगेकर, अनिल वाघमारे, शुभम दुर्वे, बंडू नाना काळे, सागर वहिले, शंतनू पोफळे, हिमांशू दळवी, बालाजी कांबळे, उज्जवला पेटकर, अश्विनी दिघे , मीनाताई चव्हाण, जालिंदर महाराज भोसले, रेणुकादास पांचाळ, बाळासाहेब वडगावकर, राहुल घोलप, पांडुरंग ठाकूर, भागवतराव आवटे, एकनाथ मोरे, श्रीकांत काकडे, भागवत शेजुळ, ज्ञानेश्वर वाघमारे, सूर्यकांत भालेकर, प्रमोद बाफना, ज्ञानेश्वर महाराज देवस्थान विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज कबीरबुवा, ज्ञानेश्वर तापकीर, बंटी तापकीर, मनोहर दिवाणे आदी उपस्थित होते. यावेळी १९७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. रक्तदात्यांनी उत्साही सहभाग नोंदविला.
राज्यात आयोजित महारक्तदान शिबिरात राज्यातील प्रत्येक मंडळ निहाय रक्तदान शिबिरास कार्यकर्ते, पदाधिकारी, रक्तदाते यांनी सामाजिक बांधिलकीतून उत्साहात रक्तदान करीत प्रतिसाद दिल्याचे आळंदी ग्रामीण मंडळ अध्यक्ष अमोल वीरकर यांनी सांगितले. या महारक्तदान शिबिराची निश्चितच गिनीज बुकात नोंद होईल असे ते म्हणाले, ग्रामीण मंडळाचे वतीने आयोजित शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे केंद्रीय निमंत्रित व राज्य परिषद सदस्य डॉ. राम गावडे, आळंदी मंडळ अध्यक्षा, माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, आळंदी ग्रामीण मंडळ अध्यक्ष अमोल वीरकर यांनी केले होते. यास पंचक्रोशीतून मोठा प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे वाढदिवसा निमित्त आळंदी मंडळ भाजपचे वतीने रक्तदान शिबिरात आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी ( श्री राम मंदिर ) विश्वस्त अर्जुन मेदनकर, मंडूबाबा पालवे आदी रक्तदात्यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्यात एकाच वेळी रक्तदान उपक्रम मंडळ निहाय राबविण्यास सांगितले. त्या प्रमाणे सम्पुर्ण राज्यात सामाजिक बांधिलकीतून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. आळंदी ग्रामीण मंडळा तर्फे साई मंगल कार्यालयात शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटन राज्य परिषद सदस्य, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक डॉ. रामशेठ गावडे यांचे हस्ते करण्यात आले. शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद देत अनेक मान्यवरांनी देखील रक्तदान केले. या प्रसंगी मंडल अध्यक्ष अमोल विरकर, माजी सभापती कल्पना गवारी, माजी सरपंच पाटीलबुवा गवारी, ज्येष्ठ नेते पांडुरंग ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब थिटे, सरचिटणीस राहुल घोलप, सोमनाथ गवारी, वासुदेव मुंगसे, दिलीप मुंगसे, दत्तात्रय मुंगसे, युवा मोर्चाचे रवींद्र ठाकूर, किशोर सूर्यवंशी, संतोष ठाणगे, देविदास बवले, नवनाथ गावडे, महिंद्र गावडे, संतोष ठाकूर, बाळासाहेब ठाकूर, संभाजी घेनंद, गहिनीनाथ लोखंडे, सुरेश लोखंडे, मंडल कार्यकारिणीचे सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. माजी शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. या महारक्तदान शिबिरात चाकण ब्लड बँक, रेड प्लस रक्तपेढी यांनी रक्त संकलन करण्यास परिश्रम घेतले. शिबिराचे यशस्वीतेसाठी आळंदी शहर भाजप आणि आळंदी ग्रामीण मंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतल्याचे माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांनी सांगितले. रक्तदाते यांना सन्मानपत्र देऊन रक्त संक्रमण अधिकारी यांचे वतीने सन्मानित करण्यात आले. साई मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य परिषदेचे सदस्य डॉ. रामशेठ गावडे पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी रक्तक्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते गजानन गाडेकर यांचे सह आळंदी ग्रामीण मंडळातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रक्तदाते यांनी केलेल्या रक्तदानात १०७ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. आळंदीत आयोजित दोन शिबिरांत मिळून ३०४ रक्तदात्यांनी रक्तदान करीत शिबिरास प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जोपासली.