ब्रेकिंग न्यूज़महाराष्ट्रशहर

वक्फ जमिनीवर हजारो कोटींचा घोटाळा उघड! पुण्यात Miss Farha Charitable Foundation कडून पहिली FIR दाखल

Spread the love

पुणे ,दि. २५ जुलै २०२५ — पुणे शहरातील बाणेर भागात वक्फ बोर्डाच्या अखत्यारीतील मौल्यवान जमिनीच्या विक्रीमध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणात Miss Farha Charitable Foundation कडून वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, सीईओ जुनेद सय्यद, Panacea Hill Co-operative Housing Society, उपनिबंधक (Haveli 15), तसेच इतर अज्ञात अधिकाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे।

तक्रारीसह ऑनलाईन एफआयआर (Police Complaint No: 19393049072500108) सुद्धा दाखल झाली असून, यामध्ये आर्थिक उलाढालींबरोबरच हवाला व्यवहारांचीही शक्यता असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

घटनेचा तपशील:

पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेच्या अगदी शेजारी असलेल्या बाणेर (Survey No. 9/1/1 आणि 9/1/2) मधील 18.15 एकर वक्फ जमिनीचा बाजारभाव ₹1200 कोटींपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. ही जमीन फक्त ₹9.5 कोटी रुपयांना २००६ साली एका सहकारी गृहनिर्माण संस्थेला विकण्यास परवानगी देण्यात आली. विक्रीनंतर ₹७ कोटी वक्फ बोर्डाला २००९ पर्यंत मिळणे अपेक्षित होते. परंतु, आजतागायत वक्फ बोर्डाला एकही रुपया प्राप्त झालेला

 

सद्य स्थितीत त्यांची एकूण बाजार किंमत हजारो कोटींमध्ये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे हा संपूर्ण व्यवहार वक्फ जमिनीच्या विक्री संदर्भातील Waqf Act 1995 च्या कलम 51 चे सरळ उल्लंघन आहे.

वक्फ म्हणजे श्रद्धेची संपत्ती – आणि तिचा अपमान हा संपूर्ण समुदायावर हल्ला

“वक्फ म्हणजे लोकांच्या श्रद्धेची संपत्ती. तिच्यावर डल्ला म्हणजे केवळ आर्थिक भ्रष्टाचार नाही, तर एका धर्माच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक हक्कांवरचा हल्ला आहे.” असे मत Miss Farha Charitable Foundation ने प्रसारित केलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आले.

 

Miss Farha Charitable Foundation ने उचललेला पुढाकार:

• RTI व्दारे माहिती मागवली: बाणेर जमिनीच्या विक्रीतील व्यवहार, त्यावरील नोटरी व मंजुरीचे दस्तऐवज, आणि पैसे कधी, कुठे व कोणाला देण्यात आले याची माहिती RTI द्वारे वक्फ बोर्ड व Haveli सब-रजिस्ट्रार कार्यालयाकडून मागवण्यात आली आहे.

• मुख्यमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, जिल्हाधिकारी व इतर यंत्रणांना पत्र: या संपूर्ण व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी शासनस्तरावर सुद्धा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

• पोलिसात तक्रार दाखल व FIR: वक्फ जमिनीच्या हेराफेरीवर आधारित पहिली ऑनलाईन FIR दाखल करून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही केवळ एक जमिनीची विक्री नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या श्रद्धेचा विश्वासघात आहे. वक्फ संपत्ती ही अनाथ, विधवा, गरीब व उपेक्षितांसाठी असते. तिचा गैरवापर म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे. आम्ही जनतेला विनंती करतो की त्यांनी या घोटाळ्याच्या विरोधात आवाज उठवावा, आणि शासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी पाठिंबा द्यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!