एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘सेमिकंडक्टर कॉन्क्लेव्ह’ २९ जुलै ला
भारताच्या सेमिकंडक्टर इकोस्टिमला बळकटी देण्याच्या उद्देश

पुणे, २६ जुलैः भारताच्या सेमिकंडक्टर इकोस्टिमला बळकटी देण्याच्या दृष्टिने एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून एमआयटी डब्ल्यूपीयूच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातफर्ें ‘सेमिकंडक्टर कॉन्क्लेव्ह २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन कोथरुड येथील डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर हॉल मध्ये मंगळवार २९ जुलै रोजी सकाळी ९.३० वा. होणार आहे. अशी माहिती डब्ल्यूपीयूचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे व इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या प्रोग्रॅम डायरेक्टर डॉ. पारूल जाधव यांनी दिली.
या कार्यक्रमाला बडोदा येथीलन व्हीएलएसआय सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सत्य गुप्ता, नवी दिल्ली येथील मेइटी स्टार्टअप हब चे सीईओ डॉ. पन्नरसेल्वम मडनक्षोपाल आणि चंदीगड येथील प्रसिद्ध सेमिकंडक्टर उद्योग तज्ज्ञ एच.एस. जताना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम संपन्न होत आहे.
उद्घाटन सत्रानंतर ‘सेमिकंडक्टर उद्योगासाठी टॅलेंट पाइपलाइनः संधी आणि आव्हाने’ तसेच ‘एआय आणि एज कंप्युटिंगच्या युगात सेमिकंडक्टर नवोप्रकम’ या विषयावर आयोजित पॅनल चर्चामध्ये तज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत.
शैक्षणिक संस्था आणि सेमिकंडक्टर उद्योग यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. तसेच इंडिया सेमिकंडक्टर मिशन, डिजिटल इंडिया आणि मेइटी स्टार्टअप हब या सारख्या राष्ट्रीय उपक्रमांच्या उद्दिष्टांशी सुसंगत राहण्यासाठी आखला गेला आहे.
या कॉन्क्लेव्हमध्ये २५० हून अधिक विद्यार्थी, संशोधक आणि उद्योग तज्ज्ञ सहभागी होणार आहे. तसेच १५ पेक्षा अधिक सीएक्सओ स्तरीय मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या वेळी ‘सेमिकंडक्टर कॉन्क्लेव्ह २०२५’चे चे प्रोग्रॅम को ऑडिनेटर डॉ.अनुजा असखेडकर व डॉ. हर्षद झोडपे उपस्थित होते.