मराठी

केंद्र सरकार प्रमाणे राज्यात देखील रोलबॉल च्या खेळाडूंना नोकरीत आरक्षणासाठी प्रयत्न करणार – ना. चंद्रकांतदादा पाटील.

केनिया येथील स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलींचा रोलबॉल 🏀 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा "दादांच्या" हस्ते सत्कार !!

Spread the love

अन्य खेळांप्रमाणे रोलबॉल खेळाचा देखील राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्काराच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करेन असे ना. श्री. चंद्रकांत दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सांगितले. तसेच केंद्र सरकार च्या निर्णयाप्रमाणेच राज्यात देखील रोलबॉल च्या खेळाडूंना नोकरीत 5% आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू व लवकरच संबंधित विभागासोबत बैठक आयोजित करू असेही चंद्रकांतदादा म्हणाले.
केनिया ची राजधानी नैरोबी येथे पार पडलेल्या 17 वर्षाखालील मुला मुलींच्या विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद जिंकलेल्या मुलींच्या संघाच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे, महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, दादासाहेब भोरे, प्रमोद काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुण्याची प्रांजल जाधव,
प्राची गर्जे अकोला,
तिशा पंडित ठाणे,
जान्हवी हेगडे नंदुरबार,
जय राजा यवतमाळ,हेमांगीनी काळे कोच,तेजस्विनी यादव फिटनेस कोच,प्राची फराटे टीम सपोर्टर,श्री मिलिंद क्षीरसागर टीम सपोर्टर यांना सन्मानित करण्यात आले.
रोल बॉल खेळाला भारतीय खेळ म्हणून ज्या प्रमाणे केंद्र शासनाने मान्यता दिली आहे आणि रोल बॉल खेळाडुंना नोकरीची संधी दिली आहे आणि राजस्थान, मध्यप्रदेश, छात्तीसगड, गुजरात, या महाराष्ट्रच्या शेजारील राज्यांमध्ये तसेच जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आसाम, झारखंड, केरळ, ई. राज्यांमध्ये त्या त्या राज्य सरकारचे क्रीडा पुरस्कार, रोख पारितोषिके, नोकरीमध्ये आरक्षण देखील तेथील रोल बॉलच्या खेळाडूंना दिले आहे तसेच धोरण महाराष्ट्र शासनाने अंगीकारावे यासाठी आपण मदत करावी असे खेळाचे जनक राजू दाभाडे म्हणाले.
रोलबॉल खेळ हा महाराष्ट्राच्या मातीमध्ये तयार झालेला खेळ असून याच्या प्रगतीसाठी केंद्र सरकारचे सर्व सहकार्य मिळत आहे. इतर राज्यातील खेळाडू, मार्गदर्शक, संघटक यांना त्यांच्या राज्य सरकारचे सहकार्य मिळत आहे. आपल्या राज्यातील खेळाडू राष्ट्रीय व अंतर राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी करून देखील या सर्व गोष्टीं पासून वंचित रहात आहेत असे महाराष्ट्र रोलबॉल असोसिएशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी निदर्शनास आणून दिले.या खेळा संदर्भातील सर्व माहिती वेळोवेळी आपल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन, पुणे यांना दिली आहे असे ही खर्डेकर म्हणाले.
ज्या प्रकारे पारंपारिक क्रीडा प्रकार म्हणून कब्बडी, खोखो, मल्लखांब, आट्यापाट्या, योगासने तसेच पॉवरलिफ्टिंग, बॉडीबिल्डींग, कॅरम, बुद्दीबळ, क्रिकेट, बिलीयर्ड आणि स्नुकर आणि कोणत्याही पायाभूत सुविधा किवा जिल्हा राज्य स्पर्धेचे आयोजन नसताना राज्यामध्ये प्रचार प्रसार दिसून येत नसताना गोल्फ, याटिंग, इक्वेस्टेरियन इत्यादी खेळांचा समावेश शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार यादी मध्ये समावेश करण्यात आला आहे, नोकरीमध्ये ५% टक्के आरक्षण खेळाच्या यादीमध्ये केला आहे याची खंत वाटते असेही राजू दाभाडे आणि संदीप खर्डेकर म्हणाले.
मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुण्यात 2023 साली झालेल्या विश्वचषक रोलबॉल स्पर्धेत महत्वाची भूमिका बजावली होती व तेव्हापासून दादा ह्या खेळाडूंच्या पाठीशी उभे आहेत, त्याच परंपरेनुसार दादा निश्चित पणे ह्या खेळाच्या बाबतीत राज्य सरकार कडे मागण्या मांडतील असा विश्वास संदीप खर्डेकर आणि राजू दाभाडे यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!