“अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त असंघटित कामगारांसाठी विशेष कार्यक्रम”

पुणे |महाराष्ट्र असंघटित श्रमिक संघ यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक भान जपत साजरी करण्यात आली. या विशेष दिवशी असंघटित कामगारांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
कार्यक्रमात नरेंद्र शंकर पारखे यांनी विशेष उपस्थिती लावून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या सामाजिक आणि क्रांतिकारी विचारांचा उल्लेख करत, श्रमिकांच्या हक्कांसाठी एकत्रितपणे संघर्ष करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात उपस्थित असलेली मान्यवर व कार्यकर्ते मंडळी:
सुनील दादा चव्हाण, सोन्या भाऊ अडसूळ, मिथुन दादा शिंदे, अंकुश पंचरास, रास आप्पा रणदिवे, संभाजी नेटके, दत्ता करके, प्रवीण मिसाळ, देवा चव्हाण, ऋषिकेश चांदणे, सूरज चव्हाण, अभिषेक क्षीरसागर, गणेश लोंढे, निखिल नाडकर, पवन लोंढे आणि इतर कार्यकर्ते.
कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध व प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, श्रमिकांच्या सक्षमीकरणासाठी अशीच एकजूट टिकवण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला