स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या रचनांवर स्वरप्रभा गायन स्पर्धेचे आयोजन

पुणे : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या रचनांवर आधारित 7व्या आंतरराष्ट्रीय स्वरप्रभा गायन स्पर्धेचे गानवर्धन आणि स्वरमयी गुरकुलतर्फे आयोजन करण्यात आले आहे.
शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगमसंगीत अशा तीन विभागात स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 15 ते 35 वयोगटासाठी ही स्पर्धा असून प्रवेश विनामूल्य आहे.
शास्त्रीय गायन स्पर्धेसाठी 15 मिनिटांचा वेळ असून भिन्न लयीतील दोन बंदिशी किंवा एक बंदिश व तराणा सादर करायचा आहे. या स्पर्धेत प्रथम 15 हजार, द्वितीय 11 हजार आणि तृतीय 8 हजार रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहे.
उपशास्त्रीय संगीतासाठी 10 मिनिटांचा वेळ असून या स्पर्धेत प्रथम 10 हजार, द्वितीय 7 हजार आणि तृतीय 5 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
सुगम संगीत स्पर्धेसाठी 6 मिनिटांचा वेळ असून स्पर्धेत प्रथम 7 हजार, द्वितीय 5 हजार आणि तृतीय तीन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी ध्वनीमुद्रण दि. 17 ऑगस्ट पर्यंत संस्थेकडे पाठवायचे आहे. अधिक माहितीसाठी डॉ. विद्या गोखले (मो. 937165223), डॉ. राजश्री महाजनी (मो. 9404227210) यांच्याशी संपर्क साधावा.