मराठी

क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार मला मिळालेल्या राष्ट्रीय युवा पुरस्कारापेक्षाही मोठा वाटतो” आमदार अमित गोरखे

आमदार अमित गोरखे यांना यंदाचा लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार बालगंधर्व येथे प्रदान.

Spread the love

क्रांतिवीर लहुजी वस्ताद प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित हिंदू मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साही वातावरणात बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे संपन्न झाला. मागासवर्गीय समाजातील
१० वी व १२वी उत्तीर्ण होत असताना उच्च गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला आमदार मा.अमित गोरखे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते १०वी व १२वीमध्ये उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन प्रोत्साहित करण्यात आले.

प्रतिवर्षी मागासवर्गीय समाजातील उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला जाणारा “क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार” यंदा पिंपरी-चिंचवडचे युवा आमदार मा. अमितजी गोरखे यांना प्रदान करण्यात आला.
“या पुरस्काराची स्थापना मागासवर्गीय समाजात सामाजिक परिवर्तन आणि शैक्षणिक जागृतीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ तसेच लहुजी वस्ताद साळवे यांनी त्यांच्या जीवनात वापरलेल्या चांदीच्या कड्याच्या प्रतीकात्मक रूपात प्रत्यक्ष चांदीचा कडा देण्यात आला. हा कडा केवळ एक स्मृतिचिन्ह नसून लहुजी वस्ताद यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाचा साक्षात्कार घडवणारे प्रतीक आहे.”

या वर्षीचा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. सुधाकर जाधवर, मिलिंद  एकबोटे  यांच्या शुभहस्ते आ.अमित गोरखे यांना प्रदान करण्यात आला. त्यांचे सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रोत्साहन,
मागासवर्गीय समाजासाठी विधीमंडळात केलेले भरीव कार्य आणि तरुण नेतृत्वातून घडवलेले सामाजिक भान याची प्रचिती म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

यावेळी आमदार अमित गोरखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले:
“तुम्ही केवळ गुणांनी यशस्वी होता तेवढंच नाही, तर तुमच्यामुळे समाजालाही उभारी मिळते. आजचा हा सन्मान तुम्हाला पुढील शिक्षणासाठी प्रेरणा देणारा ठरेल. शिक्षण हीच खरी क्रांती आहे.”

कार्यक्रमात डॉ. सुधाकर जाधवर, मा. श्री. समीर कुलकर्णी, मा. श्री. मिलिंद एकबोटे, मा. श्री. योगेश ठिपसे, किसनराव जाधव, यशस्वी उद्योजक श्री. योगेश देशपांडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!