नैसर्गोपचार सहाय्यकांच्या पहिल्या तुकडीस प्रमाणपत्र वितरण समारंभ
हेल्थ सेक्टर स्किल कौन्सिल (HSSC) च्या सहयोगाने

पुणे, ५ ऑगस्ट २०२५ , आज निसर्गग्राम, राष्ट्रीय नैसर्गोपचार संस्था, पुणे येथे नैसर्गोपचार सहाय्यकांच्या पहिल्या तुकडीसाठी प्रमाणपत्र वितरण समारंभाचा भव्य आयोजन हेल्थ सेक्टर स्किल कौन्सिल (HSSC) च्या संयुक्त विद्यमाने पार पडला. या समारंभात कौशल्याधिष्ठित ४८० तासांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.
एनआयएनच्या संचालिका प्रा. (डॉ.) के. सत्यलक्ष्मी यांनी स्वागत भाषण करत या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट, यश आणि भविष्यातील संधींबाबत माहिती दिली. एचएसएससीचे सीईओ श्री. आशीष जैन यांनी नैसर्गोपचार क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची वाढती मागणी यावर भर दिला. ते म्हणाले, “हे केवळ प्रमाणपत्र नाही तर आरोग्यदृष्ट्या सक्षम भारताच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.” तसेच एचएसएससीच्या AGM सौ. अंशू वर्मा यांनी सांगितले, “हे प्रमाणपत्र भविष्यात देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक संधी उघडेल.”
या समारंभात एकूण ५८ प्रशिक्षणार्थ्यांना त्यांच्या पालकांसह प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रगतीचा अनुभव त्यांनी शेअर केला. समारंभाचा समारोप उपस्थित मान्यवर, पालक, प्रशिक्षक, विद्यार्थी व आयोजन समितीच्या सदस्यांचे मन:पूर्वक आभार मानून करण्यात आला, ज्यांच्या समर्पणामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला.
विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख आणि मराठमोळा ‘पगड़ी’ घालून आनंदाने सहभाग घेतला. समारोप राष्ट्रगीत आणि पौष्टिक अल्पोपहाराने झाला.