धर्ममराठीशहर

ग्लोबल गणेश फेस्टिवल २०२५’च्या अध्यक्षपदी एकनाथ शिंदे, स्वागताध्यक्षपदी चंद्रकांत पाटील

मार्गदर्शन समिती प्रमुखपदी महेश सूर्यवंशी; वैभव वाघ यांची पत्रकार परिषदेत माहिती

Spread the love

पुणे: गौरवशाली परंपरा असलेल्या पुण्याचा गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक करण्यासाठी ग्लोबल गणेश फेस्टिवलचे आयोजन केले आहे. यंदा फेस्टिवलचे दुसरे वर्षआहे. फेस्टिवलच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२५ च्या अध्यक्षस्थानी यंदा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, स्वागताध्यक्षपदी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची, तर ‘मार्गदर्शन समिती’च्या प्रमुखपदी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे खजिनदार महेश सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२५ चे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फेस्टिव्हलचे मुख्य समन्वयक अनिरुद्ध येवले, आंतरराष्ट्रीय समन्वयक धनश्री पाटील, समन्वयक महेश साने, कार्यकारी अधिकारी ऋषिकेश कायत, प्रसिद्धीप्रमुख जीवराज चोले, सांस्कृतिक प्रमुख प्रणव भुरे आदी उपस्थित होते.

वैभव वाघ म्हणाले, “पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवात देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी, गणेशोत्सव आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक पद्धतीने जावा, यासाठी पुण्यातील गणेशोत्सव आयोजनात अग्रस्थानी असलेल्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून गेल्यावर्षीपासून या फेस्टिवलचे आयोजन केले जात आहे. जागतिक गणेश मंडळे व पुण्यातील गणेश मंडळांचा सामंजस्य करार घडवून आणण्यावर भर दिला जाणार आहे. यानिमित्ताने जागतिक स्तरावर विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. धार्मिक पर्यटन विकसित करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. ‘मोरया हेल्पलाईन’द्वारे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहकार्य केले जात आहे.”

“यंदा या फेस्टिवलला राज्याच्या पर्यटन विभागाचे सहकार्य लाभले आहे. जगातील अनेक महोत्सवांपेक्षा गणेशोत्सव हा अधिक व्यापक व भव्यदिव्य स्वरूपाचा आहे. परंतु, या उत्सवाला म्हणावी तशी जागतिक स्तरावर ओळख मिळाली नाही. या उत्सवाचा पर्यटन केंद्र म्हणूनही मोठा विकास होऊ शकतो. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, त्यातून रोजगारनिर्मिती उभारण्यासाठी आणि आपला पारंपरिक व ऐतिहासिक गणेशोत्सव जगभर जाण्यासाठी ‘ग्लोबल गणेश फेस्टिवल’ आयोजित करण्यात येत आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहचणे हेच मुख्य धेय आहे,” असे अनिरुद्ध येवले यांनी नमूद केले.

सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा मानबिंदु आहे. अनेक कलाकार, तंत्रज्ञ, सामाजिक-राजकीय नेतृत्व घडविण्याची कार्यशाळा म्हणूनही याकडे पाहिले जाते. लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी यांनी सुरु केलला हा गणेशोत्सव सातासमुद्रापार पोहचला. आज १०० हून अधिक देशांमध्ये हा गणेशोत्सव साजरा होतो. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने अजूनही त्याकडे नीटसे गांभीर्याने पाहिले जात नाही. ही बाब लक्षात घेऊन, २०२४ मध्ये राष्ट्रप्रथम ट्रस्ट, सदैव फाऊंडेशन आणि अमित फाटक फाऊंडेशन यांच्या वतीने आणि जय गणेश व्यासपीठाच्या समन्वयातून ‘ग्लोबल गणेश फेस्टिव्हल’ या लोकचळवळीची सुरुवात झाली. ग्लोबल गणेश फेस्टिव्हल २०२५ ला पर्यटन विभाग महाराष्ट्र राज्य, उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य तसेच पुणे श्रमिक पत्रकार संघाचे विशेष सहकार्य आहे, असे जीवराज चोले यांनी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!