खडकी पोलीस स्टेशन च्या वतीने गणेशोत्सवासाठी काल झालेल्या मंडळांच्या बैठक
पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे

बैठकीमध्ये खडकीतील काही गणेश मंडळानी काही गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी मांडली .
पुणे . खडकी पोलीस स्टेशन च्या वतीने गणेशोत्सवासाठी काल झालेल्या मंडळांच्या बैठकांमध्ये काही सूचना पोलिसांच्या वतीने दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने विसर्जन मिरवणुकीतील वाद, देखावे, तसेच पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर भर दिला आहे. बैठकीमध्ये खडकीतील काही गणेश मंडळानी काही गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी मांडली .
१) विघ्नहर्ता न्याबाबत देखील काही मनातील शंका या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे .
२) विसर्जन मिरवणुक मध्ये महात्मा गांधी चौक येथे सर्व गणपती मंडळाना फक्त १० मिनिटे पारंपरिक वाद किंवा स्पीकर लावणायची परवानगी दयावी, १० मिनिटाच्या पुढे कोणत्याही मंडळाला परवानगी देऊ नये .
३) खडकी बाजार मधील मुख्य मिरवणूक अमृत मेडिकल चौकातून सुरू होते , एक मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, विकास तरुण मंडळ गोपीचाळ, कॅन्टोन्मेंट चौकातून येते तर दुसरी मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भाजी मंडई येथून येते . अमृत मेडिकल चौक मधून दोन्ही बाजूकडून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या दोन्ही बाजू कडून प्रत्येकी एकेक गणेशोत्सव मंडळ मिरवणुकीमध्ये सोडावा . म्हणजे दोन्ही बाजूकडील मंडळांना व्यवस्थितपणे मिरवणुकीमध्ये सहभागी होता येईल . मिरवणुकीमध्ये जो गणपती मंडळ प्रथम येईल त्याला पहिले प्राधान्य देण्यात येणार आहे .
४) कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल चौकाकडून विकास तरुण मंडळ आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या कडे जाताना एम एस ई बी चे वायरिंग खाली आलेले आहेत आणि त्या वायरिंग मिरवणुकीला अडथळा ठरतात , तरी मिरवणुकीच्या अगोदर या वायरिंगचा बंदोबस्त करावा . रस्त्यातील खंबे , आणि मिरवणुकीला अडचणी ठरणारे रस्ते म्हणजे गोपी चौकातून नूतन तरुण मंडळ कडे जाताना उजव्या बाजूला पत्र्याचा आणि खांबाचा अडथळा होतो . हुले रोड वरती रस्त्यावरील विजेचे खांब याचा अडथळा होतो , तरी सर्व गणेश मंडळांनी मिरवणुकीचा रथ तयार करताना अगोदर या अडचणीच्या ठिकाणची साईज घेणे आवश्यक आहे .
आपल्या खडकी पोलीस प्रशासनाने खालील गोष्टीवर उपाययोजनां तयार केले आहेत .
प्रत्येक मोक्याचे ठिकाण आहे म्हणजे प्रत्येक चौकामध्ये कॅन्टोन्मेंट चौक, अमृत मेडिकल चौक, महात्मा गांधी चौक, स्टार ऑफ इंडिया चौक, अण्णाभाऊ साठे चौक , डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोपी चौक, नूतन तरुण मंडळ चौक, पोलीस चौकी, घोरपडे मैदान आणि नदी किनारी पोलीस असणार आहे .
प्रत्येक गणेश उत्सव मंडळाने आपल्या गणपतीच्या मांडवाजवळ एक रजिस्टर वही ठेवावी जेणेकरून पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी नोंद ठेवता येईल . प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणपती मांडवाजवळ आणि गणेश मूर्तीवर एक एक कॅमेरा लावा जेणेकरून कोणते अनुसूचित प्रकार घडणार नाही . मांडवामध्ये लाईटीचे काम करताना वायरिंग व्यवस्थित केले आहे का याची पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे .
पोलीस प्रशासनाने एमएसईबी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डला मिरवणूक मार्गांवरील लाईटीच्या वायरी , रस्त्यावरील खंबे याबाबत देखील सूचना केलेली आहे .
वाद निर्माण होतील असे देखावे करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे . शक्यतो सर्व मंडळांनी ऑपरेशन सिंदूर चा जास्तीत जास्त प्रसार करावा , समाज प्रबोधन उदाहरणार्थ महिलांसाठी असेल मुलींसाठी असतील तरुण मुलांसाठी असतील असे सामाजिक संदेश असणारे फ्लेक्स दर्शनी भागामध्ये लावावे .
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था सुरळीत चालू ठेवण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी व समस्यांवर बैठकांमध्ये चर्चा चांगली झाली आणि त्यावर उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यात आला , त्याबद्दल सर्व खडकीतील गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आपल्या खडकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.विक्रमसिंह कदम साहेब व सर्व खडकी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांचा मनापासून अभिनंदन व धन्यवाद . लवकरच अजून एक पोलीस प्रशासनाची बैठक होणार आहे तरी त्यामध्ये जास्तीत जास्त खडकीतील गणेशोत्सव मंडळ सहभागी व्हावे ही नम्र विनंती .