श्री तुळशीबाग गणरायाची प्रतिकृती जर्मनीतील नमस्ते लांगन मंडळाला प्रदान…

पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जर्मनीतील फ्रॅकफर्ट येथे एक भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सातासमुद्रापलिकडे राहाणाऱ्या भारतीय बांधवाना गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद घेता आला. यावेळी लोकमान्य टिळकांचे वंशज रोहित टिळक यांच्या शुभहस्ते, श्री तुळशीबाग गणरायाची प्रतिकृती जर्मनीतील नमस्ते लांगेन मंडळाला प्रदान करण्यात आली भारतीय परंपरा आणि गणेशोत्सवाचे वैभव परदेशातील भारतीयांपर्यंत पोहोचविणारा हा महोत्सव, पुणेकरांसाठी अभिमानास्पद ठरला आहे.
सदर कार्यक्रमास लांगन शहराचे महापौर जॅन व्हर्नर
नमस्ते लांगेन मंडळाचे अध्यक्ष रोहित बात्रा उपाध्यक्ष निशांत नाईक सचिव सागर तिदमे खजिनदार देबेंन्द्र मेहेर तसेच पुण्यातुन रोहीत टिळक,
मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, प्रविण करपे, गौरव बोराडे, मयुरेश दळवी उपस्थित होते ..
श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नमस्ते लांगन यांच्या संयुक्त विद्यमाने हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तुळशीबाग गणपती मूर्तीची प्रतिकृती महोत्सवात प्रदान करण्यात आली ..
श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडीत म्हणाले, नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्याच धर्तीवर परदेशात राहणाऱ्या भारतीय बांधवांसाठी प्रथमच हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीचा सुगंध जर्मनीत दरवळला उत्सवात सुर संगम या नृत्य-गायन व विविध गुणदर्शनाचे सादरीकरण झाले. गायक जितेंद्र भुरुक यांचा ‘सोलफुल किशोर कुमार’, तसेच राजेश दातार व प्रज्ञा देशपांडे यांची मराठी भावगीते आणि हिंदी गाणी सादर केली त्यासोबतच योगेश सुपेकर यांचे निवेदन, विनोदी किस्से आणि स्थानिक कलाकारांचा सहभाग यामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली..