मराठी

रमणबाग प्रशालेतील गोपाळांची दहीहंडी

Spread the love

दहीहंडीचा कार्यक्रम गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला. दहीहंडी विषयीचे चिंतन शाळेतील पाचवीतील विद्यार्थी अर्ष कालेकर याने सादर केले.
शालासमिती अध्यक्ष डॉक्टर शरद अगरखेडकर, मुख्याध्यापक अनिता भोसले, उपमुख्याध्यापक जयंत टोले पर्यवेक्षक अंजली गोरे, मंजुषा शेलूकर यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कलाग्राम मधील कृष्ण मंदिरातील कृष्णाचे विधिवत पूजन करण्यात आले.
‘कृष्णाचा गोपालकाला चला गड्या पाहू चला’ या गीताने’, ‘गोविंदा रे गोपाला’ या आरोळ्यांनी व ढोल ताशाच्या गजरात शाळेतील गोविंदांनी दहीहंडी फोडली. सर्व विद्यार्थ्यांनी वर्गावर्गातून गोपाळकाला तयार करुन तो प्रसाद आनंदाने एकत्रितपणे खाल्ला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व गीतगायन वैशाली भोकरे यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन दिनविशेष विभाग प्रमुख राधिका देशपांडे यांनी मुख्याध्यापक व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने केले.
शासन आदेशानुसार आज ध्वजारोहण करण्यात आले.
भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हरघर तिरंगा या मोहिमे अंतर्गत विद्यार्थ्यांनी ध्वज हातात धरुन ध्वज प्रतिज्ञा म्हटली. सर्वांना ध्वजाचे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक श्री.अतिक सय्यद व श्री.भूषण चुने हे अधिकारी उपस्थित होते. श्री.सय्यद यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना क्रांतिकारकांच्या बलिदानाची आठवण विद्यार्थ्यांना करुन दिली.स्वच्छ भारत, स्वच्छ पुणे, शालेय परिसर स्वच्छ ठेवून कचरा मुक्तीसाठी, प्लास्टिक मुक्तीसाठी एकत्रित प्रयत्न करावे, असे विद्यार्थ्यांना सांगितले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना पसायदानाची माहिती सुहास देशपांडे यांनी सांगितली. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित पसायदान म्हटले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी संपूर्ण वंदे मातरम् म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!