ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित धान्य महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

पुणे . समुत्कर्ष ग्राहकपेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित धान्य महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. ऐन गणेशोत्सवापूर्वी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने हजारो कोथरुडकरांनी सणासुदीच्या काळात लागणाऱ्या धान्यांच्या खरेदीचा मनमुराद आनंद लुटला.

कोथरुड मधील नागरिकांना सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध मिळावे यासाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १५ ॲागस्ट २०२४ रोजी समत्कर्ष ग्राहक पेठ सुरु करण्यात आली. या ग्राहक पेठेमुळे नागरिकांना दर्जेदार धान्य सवलतीच्या दरात एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासोबतच महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात आली. गेल्या वर्षभरापासून जवळपास ११ हजार पेक्षा जास्त कोथरुडकर या सुविधेचा लाभ घेत आहेत.

यंदाच्या १६ ॲागस्ट रोजी या ग्राहक पेठेस एक वर्ष पूर्ण होत असल्याने, ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून १९ आणि २० ॲागस्ट रोजी कर्वे रोड येथील हर्षल हॅाल येथे दोन दिवसीय धान्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सणासुदीच्या काळात लागणारा गहू, तांदूळ, ज्वारी कडधान्य, डाळी सर्वसामान्य ग्राहकांसाठी १५ टक्के आणि समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या सभासदांना ३० टक्के सवलतीच्या दरात खरेदीची सुवर्णसंधी या महोत्सवातून उपलब्ध करुन देण्यात आली.

या महोत्सवास कोथरुडकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत, धान्य खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. जवळपास २० हजार नागरिकांनी धान्य खरेदी केली. आगामी काळात ही कोथरुडकरांसाठी अशा पद्धतीचा धान्य महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी ना. पाटील यांनी यानिमित्ताने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!