आळंदी – मरकळ परिसरात पोलिसांचा शांततेस रूट मार्च

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील आळंदी पोलीस स्टेशन चे वतीने वरिष्ठ पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शक सूचनादेशा प्रमाणे गणेशोत्सव २०२५ आणि ईद-ए-मिलाद ( मोहम्मद पैगंबर जयंती ) पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ ३ अंतर्गत शांततेसाठी रूट मार्च काढून संचलन करण्यात आले. यावेळी आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध विभाग प्रमुख अधिकारी यांचेसह पोलीस सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद ( मोहम्मद पैगंबर जयंती ) निर्भय वातावरणात साजरा व्हावा. कायदा सुव्यवस्था, शांतता, पोलीस बंदोबस्त मधील प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून परिमंडळ तीन अंतर्गत विविध शहरात तसेच आळंदीत देखील पोलीस प्रशासनाने रूट मार्च काढत शहरात संचलन केले. या साठी आळंदी पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील तीर्थक्षेत्र आळंदीत मुख्य नगरप्रदक्षिणा मार्गावरून तसेच शहरात विविध मार्गावरून आळंदी पोलिसांनी संचलन करीत रूट मार्च काढला. समाज कंटकांना यातून दहशत मिळून निर्भय वातावरणात, शांततेत, उत्साही आनंदात उत्सव साजरा होण्यास मदत यामुळे होणार आहे.
आळंदी पोलीस स्टेशन हद्दीत गणेशोत्सव २०२५ आणि ईद-ए-मिलाद ( मोहम्मद पैगंबर जयंती ) अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ तीनचे पोलीस उप आयुक्त बापू बांगर, सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग सचिन कदम, आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एस. नरके यांचे उपस्थितीत आळंदीतून भव्य रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये पोलिस नाईक मच्छीद्र शेंडे यांचे सह पोलीस कर्मचारी, महिला पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
आळंदी शहरात आळंदी पोलीस स्टेशन मार्गे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – नगरपरिषद चौक- महाद्वार चौक – घुंडरेआळी चौक – वडगाव चौक- मरकळ चौक- विठ्ठल रुक्मिणी चौक येथून पुन्हा पोलीस स्टेशन असा रूट मार्च झाला. या नंतर मरकळ गावात देखील रूट मार्च झाला. यात मारुती चौक – श्री गणेश मंदिर- शाही मस्जिद- दत्तमंदिर- वर्पे तालीम – पुन्हा मुख्य मारुती चौक असा असा रूट मार्च घेण्यात आला. यावेळी रूट मार्च मध्ये आळंदी पोलीस स्टेशन कडील एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ५ सपोनि / पोऊनि ५० अमंलदार, चाकण पो स्टे. १० अधिकारी व ३० अंमलदार, म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशन चे ०९ अधिकारी ४० अमंलदार, आर सी पी १ चे १ अधिकारी १९ जवान, आर. सी. पी. २ चे १ अधिकारी १७ जवान, एस आर पी एफ १८ जवान, १० होमगार्ड उपस्थित होते. रूट मार्च शांततेत पार पडला आहे.