मराठी

कु. श्रावणी दिपक टोणगेचा जनसेवा सोशल फाउंडेशन औंध -बोपोडी यांच्या वतीने सत्कार

Spread the love

कु. श्रावणी दिपक टोणगे हि ने दहावीत ९३ % गुण सह जर्मनीतील प्रतिष्ठित युनायटेड वर्ल्ड कॉलेज ( UWC ) संस्थेच्या रॉबर्ट बॉश महाविद्यालयात १००% शिष्यवृत्तीसह पुढील शिक्षणासाठी तिची निवड झाली आहे . ती या शिष्यवृत्तीसाठी निवडलेली महाराष्ट्रतील एकमेव विद्यार्थी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने सचोटीने अभ्यास करीत हे यश मिळवले आहे . माननिय महानगर पालिका आयुक्त ( पि.चि मनपा ) यांनी देखील या गुणवंत विद्यार्थीनीं च्या घरी जाऊन तिचे कैतुक केले .
अशा गुणवंत विद्यार्थीनीं चे कैतुक व सन्मान सत्कार जनसेवा सोशल फाउंडेशन औंध -बोपोडी यांच्या वतीने करण्यात आला यावेळी जनसेवा सोशल फाउंडेशनचे सर्व संस्थापक कार्यकारिणी सदस्य जेष्ठ मार्गदर्शन देविदास रेड्डी साहेब , फाउंडेशन चे अध्यक्ष मयुरेश गायकवाड , फाउंडेशनच्या महिला अध्यक्षा पल्लवी ताई म्हस्के, कार्याध्यक्ष राकेश बहिरट , उपाध्यक्ष रमेश सुभेदार , सरचिटणीस सुनील दिवेकर , खजिनदार रवी नायर , बोपोडी विभाग प्रमुख जितेंद्र म्हस्के , चिखलवाडी विभाग प्रमुख अमित गुंजी , कार्यकारिणी सदस्य आनंद नाईक हे मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाची संकल्पना पल्लवी ताई म्हस्के व जितेंद्र म्हस्के यांची होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!