रिपब्लिकन पक्षाच्या पुणे शहर उपाध्यक्षपदी अयुब जहागीरदार यांची निवड

पुणे,. पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री मान. रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार पुणे शहर उपाध्यक्षपदी अयुब जहागीरदार यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या शहराध्यक्ष संजय सोनवणे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान केले.
या प्रसंगी प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, बाबूराव घाडगे, महेंद्र कांबळे, वसंत बनसोडे, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, शाम सदाफुले, वीरेन साठे यांसह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.पुणे शहर उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अयुब जहागीरदार यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतला.
या निवडीमुळे पक्षाच्या कार्यात नवी ऊर्जा मिळणार असून शहर पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी अयुब जहागीरदार काम करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला..