वाघोली-बकोरी रोड बनविण्यासाठी वाकोचे बकोरी फाटा येथे आमरण उपोषण, दुसरा दिवस*
मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करीत पाण्याचा ही त्याग करणार

विविध सोसायटीचे समर्थन
बकोरी फाटा ते बकोरी रस्ता विकासाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा लेखी स्वरूपात मिळवी*
पुणे, : वाघोली येथे गेल्या दशकांपासून प्रलंबित असलेल्या बकोरी रोड समस्येबाबत नागरिकांचा संताप आता तीव्र झाला आहे. याच अनुषंगाने समाजसेवी आणि लोक कल्याणकारी संस्था वाघोली अगेन्स्ट करप्शन ऑर्गनायझेशन (टीम वाको) च्या नेतृत्वाखाली एक आमरण उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले असून आज अन्न त्यागाचा दुसरा दिवस असून जर प्रशासनाने उद्या ठोस निर्णय घेतला नाही तर पाणी त्याग करण्याचा निर्णय अनिल कुमार मिश्रा यांनी दिला आहे.
बकोरी फाटा ते बकोरी रस्ता या विकास कामांच्या अनुषंगानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या, परंतू आम्हाला लेखी स्वरूपात रस्ता केव्हा पुर्ण होणार यांची ग्वाही प्रशासनाने अद्याप दिली नाही. आणि जो पर्यंत लेखी स्वरूपात देजत नाही तो पर्यंत आंदोलन असेच सुरु ठेवणार आहे. अशी माहिती
अनिल कुमार मिश्रा यांनी दिली. बकोरी मधील विविध सोसायटीकडून सुमारे 30 सोसायटीकडून समर्थन देण्यात आले आहे.
बिल्डर्स यांच्या संगनमतामुळे टाऊन प्लॅनिंगमध्ये दाखवलेला 60 फूट बकोरी रोड प्रत्यक्षात कधीच उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तरीसुद्धा बिल्डर्सना परवानग्या, टाऊन प्लॅनिंग मंजुरी व भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. नागरिकांकडून कर व विकास शुल्क वसूल करूनही आज रस्ता नाही, केवळ 9 फूट अरुंद रस्त्यावर जीव धोक्यात घालून रहिवाश्यांना प्रवास करावा लागतो. या फसवणुकीमुळे दररोज गंभीर अपघात, ट्रॅफिक कोंडी व प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. याच साठी स्थानिक रहिवाशी रस्त्यावर उतरले असून आमरण उपोषणास बसले आहे.काल शनिवार 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून उपोषण सुरु केले असून आज सांयकाळ पर्यंत प्रशासनाने याची कसली ही दखल घेतली नाही. यामुळे आणिखीन संतापाची लाट निर्माण झाली आहे.
पीएमआरडीए ने अनेक टाऊन प्लॅनिंग मंजुरी रस्ता अस्तित्वात नसताना कशा दिल्या, याची चौकशी करून दोषी बिल्डर्स व जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.-आजपर्यंत कलेक्टर व संबंधित प्रशासनाने नागरिकांना बकोरी रोड उपलब्ध करून का दिला नाही, याबाबत स्पष्ट व लेखी खुलासा करण्यात यावा. शासनाने आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण करून शेतकर्यांना योग्य मोबदला द्यावा. -वाघोली शहरातील बकोरी रोड तसेच इतर रस्ते तातडीने रुंदीकरण करून सुरक्षित व मान्यताप्राप्त रस्ते नागरिकांना उपलब्ध करून द्यावेत, अश्या मागण्या टीम वाकोचे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा यांनी केलल्या आहेत. हे आंदोलन बकोरी रोड उपलब्धते सारख्या मूलभूत गरजेसाठी आहे. जोपर्यंत प्रशासन ठोस कार्यवाही करत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील.या आंदोलनात वाघोली व बकोरी रोड परिसरातील हजारो नागरिकांची मोठ्या प्रमाणात समर्थन देत आहेत.