दि पूना मर्चेंटस् चेंबरची निवडणूक पार पडली – १५ उमेदवार विजयी

पुणे : दि पूना मर्चेंटस् चेंबरच्या कार्यकारी मंडळाच्या २०२५-२७ या द्वैवार्षिक निवडणुकीत आज १५ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात होते. चेंबरच्या मार्केट यार्डातील व्यापार भवन येथे झालेल्या निवडणुकीत सदस्यांनी उत्साहाने मतदान केले.
५८८ पैकी ५४४ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी ५३३ मते वैध ठरली, तर ११ मते अवैध ठरली. मतदान शांततेत पार पडले व दुपारी मतमोजणी करण्यात आली. निर्वाचन अधिकारी कंपनी सेक्रेटरी मिलींद कसोदेकर आणि ऑफिस सेक्रेटरी सौ. अनिता कुलकर्णी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडली.
विजयी उमेदवारांची नावे व मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहेत :
* राजेंद्र बाठिया (४००)
* अजित बोरा (३८१)
* नविन गोयल (३५६)
* रायकुमार नहार (३५४)
* प्रविण चोरबेले (३४७)
* ईश्वर नहार (३४७)
* आशिष दुगड (३४१)
* उत्तम बाठिया (३२१)
* राजेंद्र गुगळे (३१८)
* सचिन रायसोनी (३१२)
* शाम लढ्ढा (२८३)
* विजय मुथा (२७४)
* कन्हैयालाल गुजराथी (२७०)
* दिनेश मेहता (२७०)
* अशोक आगरवाल (२६४)
या निवडून आलेल्या १५ कार्यकारिणी सदस्यांमधून लवकरच नवे पदाधिकारी निवडले जाणार आहेत.



