मराठी

बीएसए मोटरसायकल्सची गोल्ड स्टार 650 आता मर्यादित कालावधीच्या सणासुदीच्या ऑफरमध्ये प्री-जीएसटी 2.0 दरात उपलब्ध

स्ट्रॅप: या सणासुदीच्या हंगामात पहिल्या 500 भाग्यवान खरेदीदारांना त्यांची गोल्ड स्टार 650 प्री-जीएसटी 2.0 किंमतींवर चालवता येईल, त्यासोबत 5,900 रुपयांचे लिमिटेड-एडिशन अॅक्सेसरी किट आणि आकर्षक फायनान्सिंग पर्याय देखिल उपलब्ध

Spread the love

 

पुणे, : बीएसए मोटरसायकल्सने या नवरात्रीत आपल्या प्रमुख मॉडेल गोल्ड स्टार 650 च्या पहिल्या 500 खरेदीदारांसाठी मर्यादित कालावधीची ऑफर आणली आहे. भाग्यवान ग्राहकांना केवळ प्री-जीएसटी 2.0 किंमतींवर त्यांची गोल्ड स्टार मिळणार नाही तर त्यांना विशेष लिमिटेड-एडिशन अॅक्सेसरी किट देखील मिळेल. अलीकडील जीएसटी सुधारानंतर 350सीसी पेक्षा जास्त मोटरसायकल्सवर कर 28 टक्क्यांवरून 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, परंतु बीएसए ग्राहक समाधानाला प्राधान्य देत हा दरवाढीचा परिणाम स्वतः उचलत आहे, जेणेकरून मोटरसायकल प्रेमींना उत्कृष्ट अनुभव आकर्षक किमतीत मिळू शकेल.

ऑफर तपशील: प्री-जीएसटी 2.0 किंमती (एक्स-शोरूम दिल्ली)
बीएसए गोल्ड स्टार हायलंड ग्रीन – 3,09,990 रुपये
बीएसए गोल्ड स्टार इन्सिग्निया रेड – 3,09,990 रुपये
बीएसए शॅडो ब्लॅक – 3,25,990 रुपये
बीएसए मिडनाईट ब्लॅक – 3,21,990 रुपये
बीएसए डॉन सिल्व्हर – 3,21,990 रुपये
बीएसए लेगसी शीन सिल्व्हर – 3,44,990 रुपये

मोटरसायकल प्रेमींना संपूर्ण भारतभरातील 400 पेक्षा जास्त डीलरशिप्समध्ये बीएसए गोल्ड स्टारचा प्रसिद्ध 650सीसी सिंगल-सिलिंडर परफॉर्मन्स आणि प्रामाणिक ब्रिटीश अभियांत्रिकी अनुभवता येईल. प्रीमियम क्लासिक्समध्ये त्याच्या प्रतिष्ठित डिझाइन आणि अभियांत्रिकी उत्कृष्टतेसाठी प्रिय असलेल्या गोल्ड स्टारसोबत आता पहिल्यांदाच क्युरेटेड, लिमिटेड-एडिशन ‘गोल्डी किट’ दिले जात आहे, ज्याची किंमत 5,900 रुपये आहे. यात टॉल टुरिंग विंडस्क्रीन, पिलियन बॅकरेस्ट, मेटल एक्झॉस्ट शील्ड आणि रियर रेलचा समावेश असून ते स्टाईल आणि उपयुक्तता वाढवतात.

क्लासिक लिजेंड्सचे चीफ बिझनेस ऑफिसर शरद अग्रवाल म्हणाले, “बीएसए गोल्ड स्टारने भारतात लॉन्च झाल्यापासून एक निष्ठावान चाहतावर्ग निर्माण केला आहे, ज्याने मोटरसायकलला केवळ प्रवासाचे साधन न मानता एक जीवनशैली म्हणून परिभाषित केले आहे. जीएसटी 2.0 नंतर आमच्या पहिल्या 500 ग्राहकांसाठी किंमती स्थिर ठेवून आणि त्यासोबत आमची सणासुदीची पुढाकार योजना जोडून आम्ही अधिक उत्साही मोटरसायकल प्रेमींना कोणताही तडजोड न करता ही जीवनशैली स्वीकारण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”

ज्या ठिकाणी इतर प्रीमियम ब्रँड्सनी 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झालेल्या जीएसटी 2.0 सुधारणांनंतर त्यांच्या किंमतीत बदल केले आहेत, तिथे बीएसए ग्राहक समाधानासाठी कटिबद्ध आहे. संपूर्ण देशभरात अधिकृत बीएसए डीलरशिप्समध्ये तत्काळ डिलिव्हरीसाठी मोटरसायकली उपलब्ध आहेत.

उत्साही ग्राहक केवळ 3.09 लाख रुपयांपासून गोल्ड स्टार बुक करू शकतात आणि आकर्षक फायनान्स ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात, ज्यात 5.99 टक्क्यांपासून सुरू होणारे व्याजदर, शून्य डाऊन पेमेंट आणि सहा वर्षांपर्यंतचा कर्ज कालावधी यांचा समावेश आहे. हा सणासुदीचा ऑफर बीएसए मोटरसायकल्सच्या ग्राहकांचे आभार मानण्याचा एक मार्ग आहे तसेच खुले रस्ते हे पलायन नव्हे तर आपलेपण आहे असे मानणाऱ्या मोटरसायकल प्रेमींसाठी ब्रँडच्या वचनबद्धतेचे दर्शन घडवतो.

बीएसए ची डिझाइन परंपरा: गोल्ड स्टारमध्ये बीएसए चे अनोखे ब्रिटीश डीएनए दिसते, ज्यामध्ये गोलाकार फ्युएल टँक, आयकॉनिक बॅज, पॉलिश्ड मेटल टचेस, पिनस्ट्रिपिंग आणि क्रोम पाईप्स आहेत. एलईडी लाईटिंग, वायर-स्पोक व्हील्स आणि क्रिस्प स्विचगियरसारखे आधुनिक फिचर्स त्याच्या क्लासिक कॅफे रेसर सिल्हूटमध्ये सहज मिसळतात. कोरलेल्या लाईन्स, उंच स्टान्स आणि खोलवर कंटूर केलेली सीट यामुळे त्याला कालातीत आकर्षण प्राप्त होते.

परफॉर्मन्स आणि अभियांत्रिकी: गोल्ड स्टारमध्ये 652सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर डीओएचसी इंजिन आहे, जे 45एचपी आणि 55एनएम टॉर्क निर्माण करते आणि आपल्या श्रेणीतील सर्वात शक्तिशाली आणि परिष्कृत आहे. शहरातील ट्रॅफिक आणि महामार्गावर स्मूथ पॉवर डिलिव्हरीसाठी हे ट्यून केलेले आहे. यात 5-स्पीड गिअरबॉक्स, असिस्ट आणि स्लिपर क्लच, ड्युअल-चॅनल एबीएस आणि टेलिस्कोपिक फोर्क्ससह डबल-क्रॅडल चेसिस आहे, जे आत्मविश्वासपूर्ण आणि सोपे रायडिंग देते. प्रीमियम डिस्क ब्रेक्स, रुंद टायर आणि बॅलन्स्ड सस्पेन्शन स्थिरता, नियंत्रण आणि लांब पल्ल्याचा आराम सुनिश्चित करतात.

या सणासुदीच्या हंगामात गोल्ड स्टारच्या कहाणीचा भाग बना, एक मोटरसायकल जी परंपरेवर आधारलेली आहे, आजसाठी इंजिनियर केलेली आहे आणि गर्दीत वेगळी दिसण्यासाठी तयार आहे.

निर्विघ्न मन – हमीसह
बीएसए गोल्ड स्टारसोबत नुकताच सादर केलेला ‘जावा येझदी बीएसए ओनरशिप अश्युरन्स प्रोग्राम’ दिला जातो, जो या सेगमेंटमधील पहिलाच उपक्रम आहे.
या व्यापक कार्यक्रमात 4 वर्षे/50,000 किमीची मानक वॉरंटी, सहा वर्षांपर्यंतचे विस्तारित कव्हरेज पर्याय, एक वर्षाची रोडसाइड असिस्टन्स आणि मालकी हक्काशी संबंधित विविध फायदे यांचा समावेश आहे, जे जावा येझदी मोटरसायकल्सच्या अॅडव्हेंचरच्या अभियांत्रिकी उत्कृष्टतेवर आणि दीर्घकालीन विश्वासार्हतेवर असलेला आत्मविश्वास दर्शवतात.
कंपनीने आपले सेल्स आणि सर्विस नेटवर्क 400+ टचपॉइंट्सपर्यंत वाढवले आहे, जेणेकरून सोपी अॅक्सेस आणि देखभाल उपलब्ध होईल.

About BSA Motorcycles & Classic Legends Pvt Ltd
BSA Company Ltd, trading as BSA Motorcycles, was acquired in October 2016 by Classic Legends Pvt. Ltd, a subsidiary of The Mahindra Group. The brand’s vision is to revive the legendary Birmingham-based BSA DNA, introducing modern interpretations of vintage classics for a new generation. In 2021, BSA was awarded a £4.6 million grant by the UK Government for zero-emission motorcycle development under the low-carbon automotive initiative.
Classic Legends Pvt. Ltd. was founded with a vision to reintroduce iconic motorcycle brands in India & international markets. The company currently boasts an elaborate portfolio constituting Jawa, Yezdi & BSA marquee brands. It aims to bring consumers a quintessential motorcycling lifestyle experience by co-creating exciting product and service offerings within its motorcycling ecosystem and bringing back renewed fervour into the performance-classic motorcycle market.

For further information:

Ishan Lee
LEE.ISHAN@classiclegends.com
+91 96077 11761
Anshul Dubey
anshul@avianwe.com
+91 75064 45368

Nishank Anand
nishanka@avianwe.com
+91 99133 98442

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!