स्नो मॉन्ट ब्लँक चॅप्टरचा द्वितीय वर्धापन दिन संपन्न.

पुणे (दि.२६) उद्योजक विकासासाठी स्थापन झालेल्या स्नो मॉन्ट ब्लँक चॅप्टरचा द्वितीय वर्धापन दिन संपन्न झाला. हॉटेल ऑर्बीट आपटे रोड येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संस्थापक डॉ.दीपक तोष्णीवाल, प्रमुख पाहुणे विश्वजित देशपांडे, डेप्युटी मेयर आफरीन खान, प्रेसिडेंट प्रवीण हेबरे आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील उद्योजक उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना प्रमुख पाहुणे विश्वजित देशपांडे यांनी उद्योजकांनी आपल्या व्यवसाय वाढीसाठी केंद्र व राज्य सरकारने उद्योजकांसाठी केलेल्या विविध योजनांचा लाभ घेतला पाहिजे असे सांगितले. संस्थापक डॉ.दीपक तोष्णीवाल यांनी उद्योजकांनी व्यवसाय वाढीसाठी नियमितपणे कार्य केले पाहिजे, प्रगती एका दिवसात होत नाही सातत्याने प्रयत्न केल्यास प्रगती होते असे सांगितले.



