ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

“भारत आणि महाराष्ट्रातील लोकशाही मूल्ये जागतिक स्तरावर प्रेरणादायी” – डॉ. नीलम गोऱ्हे

बार्बाडोस येथील 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेतून भाष्य

Spread the love

बार्बाडोस, १० ऑक्टोबर २०२५ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या बार्बाडोस येथे सुरू असलेल्या 68व्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन (CPA) च्या जागतिक परिषदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहेत.

या परिषदेत जगभरातील २८ देशांतील प्रतिनिधी आणि भारतातील सुमारे ३५ पीठासीन अधिकारी सहभागी झाले आहेत. उद्घाटन सत्रात “Parliaments since Beijing +30: Progress, Challenges and the Road Ahead for Gender Equality” या विषयावर डॉ. गोऱ्हे यांनी ओपनिंग रिमार्क्स सादर केले.

या प्रसंगी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “बीजिंग विश्वसंमेलनानंतर महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने झालेली प्रगती, तिची आव्हाने आणि पुढील वाटचाल या सर्व मुद्द्यांवर केलेला अर्थपूर्ण संवाद पूर्वीच दिला आहे. भारत आणि महाराष्ट्राने लोकशाही मार्गाने परिवर्तन घडवण्याची जगाला दिशा दाखवली आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि इंटेलिजन्सवरील सत्रात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. एआय
व माणुस यांच्या मध्ये सर्व क्षेत्रात फायदा होणार असला तरी व्यक्तिगत स्पर्धेत कुरघोडीचे हत्यार म्हणूनही वापरले जाऊ नये याची काळजी घ्यायला हवी असे त्या म्हणाल्या .

तसेच “CPA ची पुढील वाटचाल” या सत्रात ८ अॅाक्टोबर रोजी विविध स्थानिक पातळीवर द्वैवार्षिक परिषदा घेऊन होणारे बदल व विधीमंडळांच्या शिफारसी यावर अभ्यासाची गरज व्यक्त केली. सिपीएचे महासचिव स्टिफन ट्विग यांनी हा संवाद व खुली चर्चा आयोजित केली होती.

९ अॅक्टोबर रोजी झालेल्या Disability and Inclusion यावरील आगामी कार्यक्रमाच्या सत्रात त्यांनी आपत्ती काळात महिला, बालक आणि दिव्यांग नागरिकांच्या संरक्षणाबाबत जागतिक स्तरावरील धोरणांच्या अंमलबजावणीवर भर देण्यावर विचार मांडला.

देशोदेशीचे सांघिक व स्थानिक लोकशाहीचे समन्वय व अडचणी यावर मा. हरिवंश सिंह
तसेच या मान्यवर वक्ते म्हणुन बोलले . त्यात श्री हरिवंशसिंह यांनी भारताच्या लोकशाहीचे वैशिष्ट्य व मजबूत आधार म्हणजे भारताची राज्य घटना असल्याचे नमुद केले होते. त्यावेळी गटचर्चेत डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, “लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व स्तरांवर शांततामार्गाने आणि लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणुका घडवण्याची भारतात प्रचंड क्षमता आहे.त्यात सर्व प्रश्नांचे पडसाद उमटतात , ही जनतेची व देशातील सर्व नेतृत्वांच्या परिपक्वतेचे ऊदाहरण आहे. सहभागी सदस्यांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले व व्सासपिठावर तसेही नमुद केले .
सर्व भारतिय प्रतिनिधी व आसपासच्या सुमारे १५ विदेशी दुतावासातील प्रतिनिधींकडुन परिषदेतील कामकाजाचा आढावा लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला यांनी आढावा घेतला. त्यातही नीलम गोर्हे यांनी सहभागाची माहिती देऊन लोकसभा व विधीमंडळांच्या संदर्भ टिपणींचा फायदा होत असल्याचे नोंदवून परिषदेतील सहभागाच्या संधीबाबत आभार मानले.
या अधिवेशनात राज्यसभा उपसभापती हरिवंश सिंग, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला,विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, तसेच अनेक भारतीय पिठासीन अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!