आळंदीत मायेची ऊब व आपुलकीचं फराळ वाटप

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जागतिक अन्न दिवसा निमित्त अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत मायेची ऊब व आपुलकीचं फराळ या संकल्पने अंतर्गत स्नेहछाया परिवार दिघी , आपुलकी वृद्धाश्रम व सुंदर हा विठ्ठल वृद्धाश्रम आळंदी देवाची येथे दीपावलीच्या पूर्व संध्येला फराळ वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.
अजिंक्य डी वाय पाटील समूह लोहगाव संस्थेच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ कमलजित कौर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ फारुख सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दिलीप घुले, प्रा. विकास मोगडपल्ली यांनी उपक्रमाचे संयोजन केले.
जागतिक अन्न दिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी ची जाणीव ठेवून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सर्व स्वयंसेवकांनी स्नेहछाया परिवार दिघी, आपुलकी वृद्धाश्रम व सुंदर हा विठ्ठल वृद्धाश्रम आळंदी देवाची येथे भेट देऊन दिवाळी साजरी केली. स्नेहछाया ही पुण्यात दिघी येथील एक संस्था आहे, जी गरीब, अनाथ, आदिवासी आणि स्थलांतरित कुटुंबांतील मुलांच्या शिक्षण आणि पुनर्वसनासाठी काम करते. आपुलकी व सुंदर हा विठ्ठल वृद्धाश्रम हा ज्येष्ठ नागरिकांसाठी काळजी आणि वृद्ध रहिवाशांच्या जीवनाचा दर्जा वाढविण्याच्या वचनबद्धतेसह घरगुती वातावरण प्रदान करण्यासाठी समर्पित आहे.
स्नेहछाया परिवार दिघी, आपुलकी व सुंदर हा विठ्ठल वृद्धाश्रम संस्थापक यांनी अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजीनियरिंग रासेयो विभागाने आश्रमास दीपावली उत्सवा निमित्त भेट देऊन संस्थेतील मुलांमध्ये व वृद्ध आजी आजोबा यांच्या मध्ये नवचैतन्य व आनंदाचे क्षण निर्माण केल्याबद्दल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमास महाविद्यालयातील डॉ एस एम खैरनार, डॉ पल्लवी खरात, डॉ निलेश माळी, डॉ भाग्यश्री ढाकुलकर, डॉ कांचन वैद्य, डॉ जगन्नाथ गावंडे, अंतर्गत गुणवत्ता कक्ष समन्वयक प्राध्यापक रियाज काझी, रजिस्ट्रार गोरखनाथ शिंदे, डॉ नागेश शेळके, डॉ प्रमोद वडते, अर्जुन मेदनकर आदींचे विशेष सहकार्य लाभले.
सर्व राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांनी स्नेहछाया परिवारातील मुलांना दिवाळी फराप वाटप करून विद्यार्थ्यांना आरोग्यदायी व पर्यावरण पूरक दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आपुलकी व सुंदर हा विठ्ठल वृद्धाश्रम आळंदी येथे दिवाळी फराळ वाटप करून तेथील आजी आजोबांचे आशीर्वाद घेऊन प्रदूषण मुक्त दिवाळी उत्सव साजरा करण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला.
उपक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक साहिल, संकल्प, जान्हवी, वैष्णवी, नयन, श्रेया, आदित्य आदींनी परिश्रम घेतले.



